adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जे. ई. स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा

 जे. ई. स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा  प्रा सतिश गायकवाड मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मुक्ताईनगर : जे. ई....

 जे. ई. स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा 


प्रा सतिश गायकवाड मुक्ताईनगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मुक्ताईनगर : जे. ई. स्कूल व ज्युनिअर कॉलेज, मुक्ताईनगर येथे भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून उत्साहपूर्ण व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. एम. चौधरी, उपमुख्याध्यापिका व्ही. के. शिर्के, पर्यवेक्षक व्ही. डी. बऱ्हाटे, के. आर. कवळे सर व एस. एम. वाढे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षक दिनानिमित्त विद्यालयातील एकूण ७५ विद्यार्थ्यांनी विद्यार्थी शिक्षक म्हणून सहभाग घेतला. इयत्ता नववीत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या कु. देवश्री विकास पाटील हिने विद्यार्थी मुख्याध्यापिका म्हणून पदभार सांभाळला. तसेच कु. शर्वरी केतन पाटील व कु. मनस्वी संदीप चौधरी यांनी विद्यार्थी उपमुख्याध्यापिका म्हणून कामकाज पाहिले. सुजाता दांडगे व पूर्वजा बोंडे यांनी विद्यार्थी पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी विविध वर्गांमध्ये अध्यापनाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. विद्यार्थी शिक्षकांनी आपल्या मनोगतातून हा अनुभव अत्यंत आनंददायी व प्रेरणादायी असल्याचे सांगितले. शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी विद्यालयाचे आभार मानले. शिक्षक विद्यार्थ्यांना घडविण्याबरोबरच त्यांच्यावर संस्कार करून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास घडवितात, तसेच जीवनात गुरुचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे विचार विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मुख्याध्यापक व्ही. एम. चौधरी यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील शिक्षकांचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विचारांचा परिचय करून देत विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जान्हवी विकास पाटील व श्रिया अनिल चौधरी या विद्यार्थी शिक्षकांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षिका आर. व्ही. महाजन, उपशिक्षक एस. आर. ठाकूर, बी. एम. कोल्हे, व्ही. डी. पाटील तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. अशाप्रकारे विद्यार्थी शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शिक्षक दिनाचा कार्यक्रम आनंदमय, प्रेरणादायी व शैक्षणिक वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.

No comments