क्रॉसकंट्री स्पर्धेत पुरुष गटात खडसे महाविद्यालय विजेता; महिला गटात मु. जे. महाविद्यालय जळगाव अव्वल जळगाव विभागासाठी १२ खेळाडूंची निवड प्...
क्रॉसकंट्री स्पर्धेत पुरुष गटात खडसे महाविद्यालय विजेता; महिला गटात मु. जे. महाविद्यालय जळगाव अव्वल
जळगाव विभागासाठी १२ खेळाडूंची निवड
प्रा सतिश गायकवाड मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर : श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत जळगाव विभाग क्रीडा समितीच्या वतीने दि. ४ व ५ सप्टेंबर २०२६ रोजी आंतरमहाविद्यालयीन क्रॉसकंट्री पुरुष व महिला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांचा समारोप शनिवार, दि. ५ सप्टेंबर रोजी उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात झाला.
दि. ५ सप्टेंबर रोजी सकाळी ठीक ७ वाजता स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यावेळी उद्घाटक म्हणून मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा. डॉ. सी. एस. दादा चौधरी उपस्थित होते. व्यासपीठावर संस्थेचे संचालक मा. पुरुषोत्तम महाजन व मा. महेश पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. ए. महाजन, उपप्राचार्य डॉ. एस. बी. साळवे, उपप्राचार्य डॉ. वंदना चौधरी, जळगाव विभाग क्रीडा समितीचे सचिव डॉ. उमेश पाटील, तसेच डॉ. संजय चौधरी (अभ्यास मंडळ सदस्य), डॉ. सुभाष वानखेडे, डॉ. महेश पाटील, डॉ. नीलिमा पाटील, डॉ. वीरेंद्र जाधव व डॉ. अमर हटकर यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे डॉ. दीपक बावस्कर यांनी केले, तर आभार प्रदर्शन क्रीडा संचालक डॉ. प्रतिभा ढाके यांनी केले.
पुरुषांच्या क्रॉसकंट्री स्पर्धेत श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगरच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळविले. मु. जे. महाविद्यालय, जळगावचा संघ द्वितीय, तर पी.जी.यू.जी. जिमखाना, क. ब. चौ. उ. म.वि., जळगावचा संघ तृतीय क्रमांकावर राहिला.
महिला गटात मु. जे. महाविद्यालय, जळगावच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला. श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगरचा संघ द्वितीय, तर संत मुक्ताबाई महाविद्यालय, मुक्ताईनगरचा संघ तृतीय क्रमांकावर राहिला.
या स्पर्धेच्या माध्यमातून जळगाव विभागाच्या क्रॉसकंट्री संघासाठी पुरुष व महिला गटातील प्रत्येकी सहा, अशा एकूण १२ खेळाडूंची निवड करण्यात आली.
पुरुष गटातील निवड झालेले खेळाडू : तेजस विलास सपकाळे (कला, वाणिज्य महाविद्यालय, वरणगाव), शुभम मुलांडे (श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर), अजय वसावे (पी.जी.यू.जी. जिमखाना, उमवि, जळगाव), दीपक भोई (कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शेंदुर्णी), ओम पाटील (श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर) व जयपाल पावरा (नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव).
महिला गटातील निवड झालेले खेळाडू : जानवी रोझोदे (व्ही. एस. नाईक महाविद्यालय, रावेर), मथुरा वसावे (मु. जे. महाविद्यालय, जळगाव), दिपाली पाटील (श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर), जयंती पावरा (मु. जे. महाविद्यालय, जळगाव), तेजस्विनी ढाके (व्ही. एस. नाईक महाविद्यालय, रावेर) व मीना वळवी (मु. जे. महाविद्यालय, जळगाव).
स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय, मुक्ताईनगर तसेच पोलीस विभागाचे विशेष सहकार्य लाभले. महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मा. प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्यांमध्ये सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्या काटेकोरपणे पार पाडत स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान दिले.
स्पर्धेच्या आयोजनात जय सनान्से, प्रसाद खर्चे, साक्षी भोई, लक्ष्मी असलकर व रितेश बोदडे या विद्यार्थ्यांनीही विशेष परिश्रम घेतले.
स्पर्धेतील विजयी व उपविजयी संघ तसेच जळगाव विभागाच्या क्रॉसकंट्री संघासाठी निवड झालेल्या सर्व खेळाडूंचा याप्रसंगी सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले व पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
अशा प्रकारे श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयात दोन दिवस रंगलेल्या आंतरमहाविद्यालयीन क्रॉसकंट्री पुरुष व महिला स्पर्धा उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि खेळीमेळीच्या वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाल्या.

No comments