adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मुक्तसंचार गोठा व दूध काढणी यंत्रासाठी अनुदान योजना

  मुक्तसंचार गोठा व दूध काढणी  यंत्रासाठी अनुदान योजना अहिल्यानगर / जिमाका वृत्तसेवा  (संपादक : हेमकांत गायकवाड) पशुपालकांच्या दुग्ध व्यवसाय...

 मुक्तसंचार गोठा व दूध काढणी 

यंत्रासाठी अनुदान योजना




अहिल्यानगर / जिमाका वृत्तसेवा 

(संपादक : हेमकांत गायकवाड)

पशुपालकांच्या दुग्ध व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन दूध उत्पादन वाढविणे, पशुधनाची योग्य निगा राखणे तसेच पशुपालकांचा वेळ व श्रम वाचविण्याच्या उद्देषाने जिल्हा परिषद अहिल्यानगर अंतर्गत जिल्हा परिषद सेस निधीमधून मुक्तसंचार गोठा आणि दूध काढणी यंत्रासाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे.


 मुक्तसंचार गोठ्याच्या माध्यमातून जनावरांना मोकळ्या व हवेशीर वातावरणात ठेवण्याची सुविधा उपलब्ध होणार असून, पशुधनाच्या आरोग्य व व्यवस्थापनामध्ये सुधारणा होण्यास मदत होणार आहे. मुक्त संचार गोठा उभारणीसाठी जिल्हा परिषद सेस निधीमधून ५० टक्के किंवा रु २०,०००/- यापैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येणार आहे. तसेच दुग्ध व्यवसायातील श्रम कमी करण्यासाठी दूध काढणी यंत्र खरेदीसा्ठी अनुदान उपलब्ध करुन देण्याची तरतूद करण्यात आली आहे. यसामध्ये जिल्हा परिषद सेस निधीमधून ६० टक्के किंवा रु १५,०००/- यापैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येणार आहे.


 या आधुनिक सुविधांमुळे दूध काढण्याची प्रक्रिया अधिक स्वच्छ, सुलभ व वेळेची बचत करणारी होण्यास मदत होणार आहे. पुशपालकांनी संबंधित योजनेची माहिती व अर्ज करण्यासाठी नजीकच्या पशुवैद्यकीय चिकित्सलयाशी संपर्क साधावा. वरील योजनाचे अर्ज नजीकच्या पशुवैद्यकीय चिकित्सलायामार्फत दि.२४ सप्टेंबर २०२६ पर्यंत स्वीकारण्यात येतील. तरी पशुपालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद अहिल्यानगर मार्फत आवाहन करण्यात येत आहे.


वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर - 9561174111

No comments