adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

स्वर्गीय श्री वसंतराव सावरकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाप्रित्यर्थ प्रतिभावंतांचा सन्मान दैनिक वरूड केसरीच्या नव्या वास्तूचे थाटात पूजन; पत्रकारिता व समाजसेवेच्या नव्या पर्वाला सुरुवात

स्वर्गीय श्री वसंतराव सावरकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाप्रित्यर्थ प्रतिभावंतांचा सन्मान दैनिक वरूड केसरीच्या नव्या वास्तूचे थाटात पूजन; पत्रक...

स्वर्गीय श्री वसंतराव सावरकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाप्रित्यर्थ प्रतिभावंतांचा सन्मान

दैनिक वरूड केसरीच्या नव्या वास्तूचे थाटात पूजन; पत्रकारिता व समाजसेवेच्या नव्या पर्वाला सुरुवात 




वरुड (जि.अमरावती) प्रतिनिधी

(संपादक : हेमकांत गायकवाड)

सत्य, विचार आणि समाजहिताची भूमिका जपत सातत्याने वाटचाल करणाऱ्या ‘संध्या दैनिक वरुड केसरी’ च्या नवीन वास्तूचे पूजन तसेच स्वर्गीय श्री. वसंतराव गोपाळराव सावरकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त प्रतिभावंत व समाजसेवकांच्या सन्मान सोहळ्याचे सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता सांध्या दैनिक वरुड केसरी कार्यालय, माँ नर्मदा प्रिंटर्सजवळ, सावता चौक, वरुड (जि. अमरावती) याठिकाणी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात संपादक प्रविण सावरकर यांच्या मातोश्री श्रीमती कांताबाई वसंतराव सावरकर यांच्या शुभहस्ते करण्यात आली.

या नवीन वास्तूमध्ये ‘संध्या दैनिक वरूड केसरी’चे कार्यालय सुरू करण्यात येणार असून, नवीन वास्तूच्या पूजनामुळे वरूडच्या पत्रकारिता क्षेत्रात नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. स्वर्गीय श्री. वसंतराव गोपळराव सावरकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रतिभावंत तसेच समाजसेवकांचा यावेळी सन्मान करत त्यांना गौरविण्यात आले.

या प्रसंगी रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा मानून कार्य करणारे डॉ. आशिष काळे, समाजसेवेचा वसा घेतलेले सौरभ उर्फ मुन्नाभाऊ तिवारी तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री. कुमारजी आंडे यांचा मातोश्री श्रीमती कांताबाई सावरकर व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व शिल्ड देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार श्री.संजय खासबागे, वरूडचे नगराध्यक्ष श्री. ईश्वर सलामे, नाभिक समाजाचे अध्यक्ष श्री. रामकृष्ण शिरुककर, श्री. योगेश ठाकरे, पत्रकार डॉ. आनंद झामडे, सुप्रसिद्ध दंत रोग तज्ञ तथा बोडखे हेल्थ केअर प्रा. लि. चे संचालक डॉ. श्री. देवेन्द्र बोडखे, श्री. प्रकाश गडवे, पत्रकार तथा सुप्रसिद्ध लेखक शेषराव कडू, तुषार खासबागे, गजानन नानेटकर, नाभिक संघटनेच्या अध्यक्षा पत्रकार सौ. वर्षा तळखंडकर, सौ. स्वाती धानोरकर तसेच दुर्गावती भजन मंडळाच्या सौ. दिपा आखरे, सौ. योगिता खेरडे, सौ. प्रिया आकोटकट, सौ. सुजाता घाटोळे, सौ. अरुणा खेरडे, सौ. निलम सावरकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. यावेळी दैनिक वरूड केसरीच्या मुख्य संपादिका सौ. निलम प्रवीण सावरकर यांच्या संकल्पनेतुन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘वृत्तातून समाजहित... विचारातून नवी दिशा’ या ध्येयाने वाटचाल करणाऱ्या दैनिक वरूड केसरीच्या नव्या वास्तूचे पूजन व कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्यामुळे पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात नव्या पर्वाला सुरुवात होणार असल्याचे यावेळी दैनिक वरूड केसरीचे सहसंपादक तथा स्वर्गीय श्री. वसंतराव सावरकर पुरस्कार सेवा समितीचे अध्यक्ष श्री. निखिल बावणे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे आयोजन प्रविण सावरकर, निखिल बावणे व तुषार खासबागे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दैनिक वरुड केसरी वृत्तपत्र समृह व माँ नर्मदा प्रिंटर्स टिमचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रसिद्ध लेखन श्री शेषराव कडू यांनी केले तर आभार प्रदर्शन निखिल बावणे यांनी केले.

वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर - 9561174111

No comments