adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जरासाही मोह बाळगला नाही,जरी मिळालं होतं सोनं ! कारण साईंबाबाजींची भक्ती, हेच तर आमुचे धनं !!

  जरासाही मोह बाळगला नाही,जरी मिळालं होतं सोनं ! कारण साईंबाबाजींची भक्ती, हेच तर आमुचे धनं !! अयूब पठाण / शिर्डी (संपादक : हेमकांत गायकवाड)...

 जरासाही मोह बाळगला नाही,जरी मिळालं होतं सोनं !

कारण साईंबाबाजींची भक्ती, हेच तर आमुचे धनं !!




अयूब पठाण / शिर्डी

(संपादक : हेमकांत गायकवाड)


श्री साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांची इमानदारी पदोपदी पहावयास मिळत आहे. अशीच एक घटना गेट नं. १ समोर घडली.

श्री साईबाबा संस्थान, शिर्डीच्या विद्युत विभागातील कर्मचारी श्री. मारुती शिवराम कांदळकर यांना मंदिर परिसरातील गेट क्र. १ जवळ एक सोन्याची अंगठी सापडली. सदर अंगठी त्यांनी कोणताही विलंब न करता प्रामाणिकपणे श्री साईबाबा संस्थानच्या संरक्षण कार्यालयात जमा केली.

सदर सोन्याच्या अंगठीचे वजन ३.३९० ग्रॅम असून तिची अंदाजे किंमत ₹ ४५,०००/- इतकी आहे. श्रीमारुती शिवराम कांदळकर यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणा व कर्तव्यनिष्ठेचे श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. गोरक्ष गाडीलकर तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. भीमराज दराडे यांनी अभिनंदन केले आहे.

वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर -9561174111

No comments