adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अडावद येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

अडावद येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या   अडावद प्रतिनिधी रविंद्र कोळी  (संपादक : हेमकांत गायकवाड) अडावद ता.चोपडा येथील वरचा माळी वाड्यात...

अडावद येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या  




अडावद प्रतिनिधी रविंद्र कोळी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


अडावद ता.चोपडा येथील वरचा माळी वाड्यातील रहिवासी विजय ऊर्फ बंटी प्रताप माळी (३६) या कर्जबाजारी शेतकऱ्याने सततच्या नापिकीला कंटाळून यावर्षीचे पीक तर पावसाअभावी गेले पुढे शेती कशी करणार या विवंचनेत आत्महत्या केली. 

     १८ रोजी दुपारी शेतात झाडाला ठिबक नळ्यांचा वापर करून गळफास लावून आत्महत्या केली. शेतकरी विजय माळी यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात रवानगी केली. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश पाटील यांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय अधिकारी डॉ सुरेश पाटील यांच्या खबरीने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. 

     शेतकरी विजय प्रताप माळी हे

  चार बिघे असलेली शेती कसत होते. मागच्या वर्षी मुग, उडीद, कांदा पिक घेतले मात्र तेव्हा कांद्याला भाव नसल्याने लागवडीचा खर्च देखील निघाला नाही. यावर्षी मोठ्या आशेने पुन्हा हात उसनवार क्रेडिट कार्डचे कर्ज घेऊन शेतात मका लागवड केली. परंतु पावसाअभावी पीक आले नाही. तसेच मका काढल्यावर कांदा लागवड करण्यासाठी कांदा बियाणे टाकले होते ते रोपसुद्धा पावसाच्या फटक्याने नष्ट झाले. आता पुढे कर्ज कसे फिटणार तसेच जगण्यासाठी काय करायचे या विवंचनेत असतांना त्यांनी आपले जीवन संपवले . १९ रोजी सकाळी दहा वाजता त्यांचेवर अडावद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

       मयत विजय माळी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, वृद्ध आई वडील असा परिवार आहे.

No comments