adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर येथे २०११ पूर्वीपासून सरकारी जमिनीवर वास्तव्यास असलेल्या कुटुंबांसाठी विशेष शिबिर १६० अर्ज प्राप्त

 फैजपूर येथे २०११ पूर्वीपासून सरकारी जमिनीवर वास्तव्यास असलेल्या कुटुंबांसाठी  विशेष शिबिर १६० अर्ज प्राप्त    इदू पिंजारी फैजपूर  (संपादक -...

 फैजपूर येथे २०११ पूर्वीपासून सरकारी जमिनीवर वास्तव्यास असलेल्या कुटुंबांसाठी  विशेष शिबिर १६० अर्ज प्राप्त  


 इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

  शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमण नियमित करणे करिता  आवश्यक प्रक्रियेसाठी कॅम्प; नगरसेवक हकीम तडवी यांच्या तसेच नगरसेविका सुमय्या बी शेख कुर्बान यांच्या पाठपुराव्याला यश

फैजपूर शहरातील प्रभाग क्रमांक १ मध्ये सन २०११ पूर्वीपासून   शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमण नियमित करणे करीता, यासाठी आज विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते संबंधित कुटुंबांना आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया, कागदपत्रे संदर्भातील मार्गदर्शन या कॅम्पच्या माध्यमातून देण्यात येऊन फॉर्म भरून घेण्यात आले .

प्रभाग क्रमांक १ मधील नागरिकांचा हा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. ही बाब लक्षात घेऊन नगराध्यक्ष दामिनी पवन सराफ तसेच नगरसेवक हकीम तडवी नगरसेविका सुमय्या शेख कुर्बान यांनी मे २०२६ मध्ये प्रशासनाकडे निवेदन देऊन या प्रश्नासाठी पाठपुरावा सुरू केला होता. संबंधित  शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमण नियमित करता यावीत यासाठी त्यांनी प्रशासनाकडे सातत्याने मागणी केली.

या पाठपुराव्यानंतर प्रशासनाच्या वतीने आज प्रभाग क्रमांक १ मध्ये विशेष कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. या कॅम्पमध्ये पात्र लाभार्थी कुटुंबांची माहिती घेऊन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व पुढील प्रशासकीय कार्यवाहीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

अनेक वर्षांपासून सरकारी जमिनीवर वास्तव्यास असलेल्या कुटुंबांचा उक्त प्रश्न मार्गी लागण्याच्या दृष्टीने हा कॅम्प महत्त्वपूर्ण मानला जात आहे. त्यामुळे संबंधित नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह कॅम्पमध्ये उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेवक हकीम तडवी तसेच सुमया बी शेख कुर्बान यांनी केले यावेळी नगरपरिषद चे उपनगराध्यक्ष विनोद चौधरी बांधकाम सभापती सागर होले गटनेते शेख इरफान नगरसेवक पवन सराफ नगरसेवक अन्वर खाटीक नगरसेवक शेख युनूस शेख अयुब गबरू मेंबर   समाजसेवक आवेश भांजा काँग्रेस शहराध्यक्ष रियाज मेंबर कलिंम मेंबर पालिकेचे बांधकाम इंजिनियर जगदीश महाजन वास्तु सर्व्हे कन्सल्टन्सी, अमळनेर रोहित सोनार, मंगेश श्याम पाटील, महेश भावसार) हे यावेळी उपस्थित होते

No comments