फैजपुरात शासकीय जमिनीवर राहणाऱ्या कुटुंबांना मिळणार पक्के घर शिबिर यशस्वी २०११ पूर्वीपासून शासकीय जमिनीवर राहणाऱ्या कुटुंबांना मिळणार पक्क...
फैजपुरात शासकीय जमिनीवर राहणाऱ्या कुटुंबांना मिळणार पक्के घर शिबिर यशस्वी
२०११ पूर्वीपासून शासकीय जमिनीवर राहणाऱ्या कुटुंबांना मिळणार पक्के घर
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शासकीय जमिनीवर सन २०११ पूर्वीपासून वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना पक्के घर मिळावे, या उद्देशाने दिनांक ४ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष १ मार्गदर्शन व अर्ज संकलन कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
नगरसेवक गब्लू मेंबर आणि डॉ. शेख नगरसेवक दानिश शेख यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात पात्र नागरिकांना घरकुलासंदर्भात आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी तब्बल ९२ पात्र नागरिकांचे अर्ज संकलित करण्यात आले.
गरजू व पात्र कुटुंबांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच प्रत्येक गरजू नागरिकाला त्याचा हक्क मिळवून देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास नगराध्यक्ष दामिनी पवन सराफ, उपनगराध्यक्ष विनोद चौधरी, बांधकाम सभापती सागर होले, नगरसेवक युनूस शेख अय्यूब, नगरसेवक पवन अनिल सराफ, माजी नगरसेवक रियाज मेंबर, राशिद तडवी, जगदीश महाजन, प्रवीण सपकाळे तसेच वास्तु सर्व्हे कन्सल्टन्सी, अमळनेरचे रोहित सोनार, मंगेश (श्याम) पाटील आणि महेश भावसार यांची उपस्थिती होती.
गरजू नागरिकांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी जनसेवेचा हा उपक्रम निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.


No comments