गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर सावदा पोलिसांचे पथसंचालन. मिरवणुक मार्गावर सीसीटीव्ही ची नजर.. शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ...
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर सावदा पोलिसांचे पथसंचालन. मिरवणुक मार्गावर सीसीटीव्ही ची नजर..
शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन दक्ष
सावदा प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
उद्या होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक निर्विघ्न शांततेने पार पडण्यासाठी
सावदा पोलिसांनी पथसंचलन केले
सावदा शहरातील सामाजिक सलोखा एकात्मता कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी गणेशोत्सवाला कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू नये व कुठे गालबोट लागू नये, यासाठी सावदा पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. या अनुषंगाने गुरुवारी दि. २४ सप्टेंबर सायंकाळी सावदा पोलीस स्टेशनचे वतीने सावदा शहरातील मुख्य चौकातून व प्रमुख मार्गांवरून रूट मार्च काढून पोलीसांनी पथसंचालन केले.
सावदा पोलीस स्टेशनचे शिस्तप्रिय, शिस्तबद्ध कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पांडुरंग फड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल सानप, पीएसआय जयराम खोडपे सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान हा रूट मार्च पार पडला. यामध्ये सावदा पोलीस ठाण्याचे २ दुय्यम अधिकारी, २० पोलीस अंमलदार, जालना येथील ५ नवप्रविष्ट पोलीस शिपाई, पालघर येथील ४ एचएसपी, १ आरसीपी प्लाटून (१+११), ट्रायकिंग फोर्स (१+७) तसेच ३५ होमगार्ड जवान सहभागी झाले होते.
रूट मार्चच्या माध्यमातून गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक सूचना व मार्गदर्शन करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्ग तसेच संवेदनशील ठिकाणांवरून पोलिसांनी संचलन करत नागरिकांना शांतता व सुव्यवस्था राखण्याचा संदेश दिला.
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. प्रमुख चौक, संवेदनशील ठिकाणे आणि विसर्जन मार्गावर पोलिसांचा आवश्यक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
गणेशोत्सव शांततेत, उत्साहपूर्ण आणि सलोख्याच्या वातावरणात पार पाडण्यासाठी नागरिकांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे. तसेच कोणत्याही अफवा किंवा गैरसमजांवर विश्वास न ठेवता शांतता व सामाजिक सलोखा कायम ठेवावा, असे आवाहन सावदा पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.


No comments