समाजकार्य महाविद्यालय, चोपडा येथे राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस उत्साहात संपन्न चोपडा प्रतिनिधी (संपादक : हेमकांत गायकवाड) आज दि. 24 सप...
समाजकार्य महाविद्यालय, चोपडा येथे राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस उत्साहात संपन्न
चोपडा प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
आज दि. 24 सप्टेंबर 2026 रोजी भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) स्थापना दिवस निमित्ताने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदाणकर,(प्राचार्य, समाजकार्य महाविद्यालय, चोपडा), प्रा. डॉ. आशिष गुजराथी,(उपप्राचार्य, समाजकार्य महाविद्यालय, चोपडा), प्रा. डॉ. प्रकाश लभाणे, (कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा), मा. अरुण संदनशिव (मुख्याध्यापक, महिला मंडळ, चोपडा) प्रा. डॉ. संबोधी देशपांडे, प्रा. डॉ. उत्तम सोनकांबळे, प्रा. डॉ. मोहिनी उपासनी, प्रा. डॉ. कल्पना सोनवणे सर्व प्राध्यापक वृंद, विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी एनएसएस गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. संबोधी देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्या कोळी या विद्यार्थिनीने केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदाणकर आणि उपप्राचार्य प्रा. डॉ. आशिष गुजराथी यांनी सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस निमित्ताने शुभेच्छा दिल्या.
प्रा. डॉ. प्रकाश लभाणे,
(कला, शास्त्र, व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा) यांनी राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी "राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये युवकांची भूमिका" या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे ब्रीदवाक्य NOT Me BUT U याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजनेमधून खऱ्या अर्थाने युवकांचे व्यक्तिमत्व विकसित होते. राष्ट्रीय सेवा योजनेमधून अनेक उपक्रम राबवले जातात. तसेच सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिरामधून श्रमदानाचे महत्त्व, परिसर स्वच्छता, वृक्षारोपण यासारखे विविध समाजउपयोगी उपक्रम राबवून खऱ्या अर्थाने भारतातील युवकांचे व्यक्तिमत्व विकसित केले जाते. ही योजना युवकांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टिकोनातून आणि भावि काळातील युवकांच्या जडणघडणीसाठी महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. यानंतर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नंदिनी पवार या विद्यार्थिनीने केले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदाणकर, उपप्राचार्य प्रा.डॉ.आशिष गुजराथी, प्रा. डॉ. संबोधी देशपांडे, (कार्यक्रम अधिकारी), प्रा. डॉ. उत्तम सोनकांबळे, (सहाय्यक, कार्यक्रम अधिकारी), सर्व प्राध्यापक वृंद, शिककेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी यांनी सहकार्य केले.

No comments