केळी उत्पादक शेतकऱ्याचे ३०८ कोटीचे पीक विमा दावे मंजूर! अंतुर्ली प्रतिनिधी किरण धायले (संपादक : हेमकांत गायकवाड) वर्षभर बागेची काळजी घेतल...
केळी उत्पादक शेतकऱ्याचे ३०८ कोटीचे पीक विमा दावे मंजूर!
अंतुर्ली प्रतिनिधी किरण धायले
(संपादक : हेमकांत गायकवाड)
वर्षभर बागेची काळजी घेतल्यानंतर अवघ्या काही तासाच्या वादळाने उभी असलेली केळी बाग भुईसपाट होते कुठे झाडें मोडून पडतात तर कुठे घडाचे नुकसान होते. सर्व केळीचे उत्पादन हातातून जाते.पीक डोळ्यासमोर उद्वस्त होते. अशातच शेतकऱ्यांसमोर पुढील हंगामाची तयारी,कर्जाची परतफेड, कुटुंबाचा उदरनिर्वाह अशी अनेक संकटे उभी राहतात तसेच केळी उत्पादणाचा खर्चही भरपूर असतो एक रोपाचा 20 रु आणि इतर खर्च साधारण एकूण १५० रु खर्च येतो.त्यामुळे हजारो झाडांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्याच्या डोक्यावर लाखो रुपयाचा आर्थिक भार पडतो. अशावेळी पीक विमाच त्याच्यासाठी मोठा आधार ठरतो. विमा काढल्यानंतर नुकसान झाल्यास प्रत्येक्ष पाहणी नुकसान नोंदणी,आणि दावा दखल प्रक्रियेतही विलंब होण्याच्या तक्रारी आहे, पूर्ण क्षेत्राचा विमा काढून हप्ता भरल्यानंतर प्रत्येक्ष नुकसान भरपाई मात्र कमी क्षेत्रापूरती निश्चित असल्याच्या तक्रारी आहे. असे असल्याकरणाने शेतकऱ्याच्या अडचणीत अधिक भर पडत. नैसर्गिक आपतीमुळे शेतात केळीची झाडें तशीच ठेवणे शक्य नसते. झाडें काढून टाकल्याशिवाय पुढील लागवड शक्य नाही.त्यामुळे नुकसान झाल्यानंतर विमा कंपनीकडून नोंदणी वेळेत होणे महत्वाचे आहे.विलंब झाल्यास शेतकऱ्यांसमोर नुकसान सिद्ध करण्याचे ही आव्हाण निर्माण होते. या पश्वभूमीवर ३०८ कोटी रुपयांचा दावा मंजूर होणे हा केळी उत्पादकसाठी मोठा आर्थिक आधार मानला जात आहे.

No comments