adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा उत्साहात २७७ उमेदवारांची नोंदणी; १०१ उमेदवार मुलाखतीस सामोरे

  यावल येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा उत्साहात २७७ उमेदवारांची नोंदणी; १०१ उमेदवार मुलाखतीस सामोरे यावल प्रतिनिधी  (संपादक : हेमक...

 यावल येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा उत्साहात

२७७ उमेदवारांची नोंदणी; १०१ उमेदवार मुलाखतीस सामोरे





यावल प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


यावल, दि. २९ : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकल्पनेतून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव आणि जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, यावल यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन मंगळवारी (दि. २९) करण्यात आले. मेळाव्याचे आभासी पद्धतीने सकाळी १०.४५ वाजता मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. श्री. चंद्रकांत पाटील, कौशल्य, रोजगार व उद्योजकता मंत्री मा. श्री. मंगल प्रभात लोढा तसेच पणन मंत्री मा. श्री. जयप्रकाश रावल यांनी मार्गदर्शन केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी ४१८ ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या शासनाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. अशा उपक्रमांमुळे युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन ‘विकसित भारत @ २०४७’चे स्वप्न साकारण्यास मदत होईल, असे त्यांनी प्रतिपादन केले.

या रोजगार मेळाव्यासाठी डिप्लोमा ७, आय.टी.आय. १४१, एस.एस.सी. व एच.एस.सी. १०७ आणि पदवी-पदव्युत्तर २२, अशा एकूण २७७ उमेदवारांनी नोंदणी केली. त्यापैकी १०१ उमेदवार मुलाखतीस सामोरे गेले. विविध कंपन्या व संस्थांनी ट्रेनी, फिल्ड वर्क, विमा प्रतिनिधी, बिझनेस ऑफिसर, रिसेप्शनिस्ट, सेल्स एक्झिक्युटिव्ह आदी पदांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज. जि. म. वि. प्र. संस्थेचे संचालक मा. श्री सुनीलभाऊ भोईटे, पोलीस निरीक्षक प्रतिनिधी श्री मोइनोद्दीन सय्यद, वैद्यकीय अधिकारी तसेच विविध शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये प्रा. डॉ. एस. आर. गायकवाड,प्र .प्राचार्य,कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, यावल, प्रा. पी. बी. पाटील, प्राचार्य, आय.टी.आय., यावल, उपप्राचार्य प्रा. डॉ. एच. जी. भंगाळे, प्रा. एम. डी. खैरनार, समन्वयक प्रा. इमरान खान यांचा समावेश होता. सूत्र संचालन प्रा. पंकज बोदडे यांनी केले, तर केंद्र समन्वयक डॉ. बी. सी. पाटील यांनी आभार मानले.

महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एस. आर. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी रोजगार मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.

No comments