adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बीजयुक्त गणपतीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश मानव सेवा प्राथमिक विद्या मंदिरात विद्यार्थ्यांना शाडूमातीच्या गणपती निर्मितीचे प्रात्यक्षिक

 बीजयुक्त गणपतीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश मानव सेवा प्राथमिक विद्या मंदिरात विद्यार्थ्यांना शाडूमातीच्या गणपती निर्मितीचे प्रात्यक्षिक  ज...

 बीजयुक्त गणपतीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मानव सेवा प्राथमिक विद्या मंदिरात विद्यार्थ्यांना शाडूमातीच्या गणपती निर्मितीचे प्रात्यक्षिक 


जळगाव प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जळगाव : गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने मानव सेवा मंडळ, जळगाव संचलित प्राथमिक विद्या मंदिरात विद्यार्थ्यांसाठी बीजयुक्त शाडूमातीच्या गणपती निर्मितीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.

चित्रकार व मूर्तिकार सुनिल दाभाडे यांनी विद्यार्थ्यांना शाडूमातीपासून गणपतीची मूर्ती तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच बीजयुक्त गणपतीचे महत्त्व, विसर्जनानंतर त्यापासून रोपांची निर्मिती आणि पर्यावरण संवर्धन याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली.

यावेळी महानगरपालिका अभियंता प्रकाश पाटील यांनी पर्यावरणपूरक गणपती मूर्तींचे महत्त्व स्पष्ट करून गणेशोत्सवात पर्यावरणाचा समतोल राखण्याचे आवाहन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका माया अंबटकर यांनीही विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील, मनोजकुमार बावस्कर, योगिता घोलाणे, हर्षा चौधरी, मीरा चौधरी, वैशाली साळुंके यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत शाडूमातीपासून गणपती मूर्ती तयार करण्याचा अनुभव घेतला.

या उपक्रमाचे मानव सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. आर. एस. डाकलिया, मानद सचिव विश्वनाथ जोशी, तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी कौतुक केले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या सुनिल दाभाडे यांच्या उपक्रमाचे विशेष अभिनंदन करण्यात आले.

‘गणपती बाप्पा मोरया, पर्यावरणपूरक गणपती घरोघरी आणूया!’ असा संदेश देत उपक्रमाचा समारोप करण्यात आला.

No comments