adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जे. ई. स्कूल व ज्युनिअर कॉलेज, मुक्ताईनगर येथे कृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा

 जे. ई. स्कूल व ज्युनिअर कॉलेज, मुक्ताईनगर येथे कृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा  प्रा सतिश गायकवाड मुक्ताईनगर (संपादक -:- हे...

 जे. ई. स्कूल व ज्युनिअर कॉलेज, मुक्ताईनगर येथे कृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा 


प्रा सतिश गायकवाड मुक्ताईनगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जे. ई. स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये कृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडीचा सण अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात पार पडला. या सोहळ्यामुळे संपूर्ण शाळा परिसर आनंद आणि उत्साहाने दुमदुमून गेला होता.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलांवर आधारित 'कृष्णलीला' ही सुंदर नाटिका सादर केली. तसेच श्रीकृष्ण जन्माचा प्रसंग अत्यंत भावपूर्ण पद्धतीने साकारून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकून घेतली. नाटिका आणि सांस्कृतिक कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागात दहीहंडी फोडण्याचा मुख्य कार्यक्रम पार पडला.

या उपक्रमाबाबत बोलताना मान्यवरांनी सांगितले की, कृष्ण जन्माष्टमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना श्रीकृष्णाच्या जीवनातील प्रेम, मैत्री, धैर्य, एकता आणि सदाचार या मूल्यांची ओळख होते; तर दहीहंडीसारख्या खेळातून एकजूट, सहकार्य आणि सांघिक भावना (टीमवर्क) शिकायला मिळते.

या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक  व्ही. एम. चौधरी, उपमुख्याध्यापिका  व्ही. के. शिर्के, तसेच पर्यवेक्षक व्ही. डी. बऱ्हाटे, के. आर. कवळे आणि  एस. एम. वाढे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील शिक्षिका ए. पी. पाटील, एल. व्ही. पाटील, आर. व्ही. महाजन, एस. एस. कोलते, वाय. व्ही. पवार यांनी केले तसेच यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक बंधू-भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. अत्यंत आनंददायी आणि भक्तिमय वातावरणात या कार्यक्रमाची सांगता झाली.

No comments