रावेर ला घरगुती गणपती विसर्जन मार्गावरुन जातांना किरकोळ दगडफेक;काही वेळ तणाव १५ ते २० जणाविरुध्द ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल! रावेर पोलिसांच...
रावेर ला घरगुती गणपती विसर्जन मार्गावरुन जातांना किरकोळ दगडफेक;काही वेळ तणाव
१५ ते २० जणाविरुध्द ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल! रावेर पोलिसांचा तात्काळ हस्तक्षेप
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
रावेर शहरात रविवारी गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. घरगुती गणपतीची मूर्ती रिक्षातून विसर्जनासाठी नेत असताना काही व्यक्तींनी रिक्षा अडवून पुढे जाण्यास विरोध केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर काही सेकंद किरकोळ दगडफेक झाल्याचे समजते.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार चार महिलांना दुखापत होऊन जखमी झाल्याचे वृत्त आहे
याबाबत आंबेडकर नगर मधील रहिवासी लताबाई ईश्वर घेटे वय ३५ यांनी रावेर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून १५ ते २० जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीसह दंगली चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयित आरोपींचे अटक सत्र पोलीस प्रशासनाने सुरू केले आहे
घटनेची माहिती मिळताच रावेर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर संबंधित घरगुती गणपतीचे विसर्जन शांततेत पूर्ण झाले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांनी रावेर पोलीस येथे तातडीने दाखल होत परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आढावा घेतला. घटनेमागील कारण आणि संबंधित व्यक्तींची माहिती पोलिसांकडून तपासली जात आहे. संशयितांविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचे वृत्त आहे.
रावेर शहरात शांतता
घटनेनंतर रावेर शहरातील परिस्थिती नियंत्रणात असून सध्या शांतता आहे. पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.
दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही अफवा किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये. सोशल मीडियावर खात्री न झालेली माहिती, फोटो किंवा व्हिडिओ प्रसारित करू नयेत, असे आवाहन रावेर पोलिसांकडून करण्यात आले आहे.आगामी गणेश विसर्जन अनुषंगाने वाढीव बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे
सध्या शहरात शांतता असून परिस्थितीवर रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे एपीआय अमोल बच्छाव पीएसआय मनोज महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी लक्ष ठेवून आहेत

No comments