adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शेतकरी-कष्टकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या पत्रकारांचा सन्मान क्रांतीसेनेच्या वतीने राहुरी फॅक्टरी येथे पुरस्कारप्राप्त पत्रकारांचा गौरव

शेतकरी-कष्टकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या पत्रकारांचा सन्मान क्रांतीसेनेच्या वतीने राहुरी फॅक्टरी येथे पुरस्कारप्राप्त पत्रकारांचा गौर...

शेतकरी-कष्टकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या पत्रकारांचा सन्मान

क्रांतीसेनेच्या वतीने राहुरी फॅक्टरी येथे पुरस्कारप्राप्त पत्रकारांचा गौरव




जावेद शेख / राहुरी

(संपादक : हेमकांत गायकवाड)


शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना पत्रकारितेच्या माध्यमातून सातत्याने वाचा फोडत, त्यांच्या समस्या शासन - प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणाऱ्या पत्रकारांचा क्रांतीसेनेच्या वतीने राहुरी फॅक्टरी येथे सन्मान करण्यात आला. पत्रकारितेसह सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पुरस्कारप्राप्त मान्यवरांचाही यावेळी गौरव करण्यात आला.

राहुरी तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार सुधाकर कराळे, रफीकभाई शेख, राजेंद्र उंडे व रियाजभाई देशमुख यांना पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘पत्रकारितारत्न’ पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल क्रांतीसेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शिवसेना जिल्हा उपप्रमुख आण्णा पाटील म्हसे यांना ‘समाजरत्न’ पुरस्कार मिळाल्याबद्दल गौरविण्यात आले.

ग्रामीण भागातील पत्रकारिता ही केवळ बातमी देण्यापुरती मर्यादित नसून, शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठीचा संघर्ष आहे, असे यावेळी उपस्थितांनी नमूद केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर वेळप्रसंगी आक्रमक भूमिका घेत शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे काम पुरस्कारप्राप्त पत्रकारांनी केले आहे. त्यांच्या या योगदानाची दखल घेत क्रांतीसेनेच्या वतीने सन्मान करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

यावेळी दादासाहेब पवार, मधुकर म्हसे, रफीकभाई शेख आणि अशोकराव घाडगे यांनी मनोगत व्यक्त केले.

 ग्रामीण पत्रकारितेच्या माध्यमातून शेतकरी, कष्टकरी, वंचित आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. पुरस्कार ही केवळ व्यक्तीच्या कार्याची पावती नसून समाजातील प्रश्नांसाठी सुरू असलेल्या पत्रकारितेच्या लढ्याला मिळालेली दाद असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

यावेळी राहुरी कारखान्याचे माजी डिस्टिलरी मॅनेजर बबनराव धोंडे, क्रांतीसेना संपर्कप्रमुख मधुकर म्हसे, सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पवार, युवा जिल्हा उपाध्यक्ष शेखर पवार, पत्रकार राजेंद्र परदेशी, धर्मेंद्र मुसमाडे, दत्तात्रय हिवाळे, विक्रम मोढे, हर्षद धोंडे, पुरुषोत्तम मुसमाडे, वैभव संकलेचा, संजय मुसमाडे, अशोक घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दादासाहेब पवार यांनी केले. 

पुरस्कारप्राप्त पत्रकारांचा सन्मान झाल्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील पत्रकारितेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर - 9561174111

No comments