adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मोफत वाटणं म्हणजेच गाजर दाखवून लुटणं. प्रदीप पाटील गणपूर (जळगाव)

मोफत वाटणं म्हणजेच गाजर दाखवून लुटणं. प्रदीप पाटील गणपूर (जळगाव ) मच्छिंद्र रायसिंग गलंगी तालुका चोपडा (संपादक : हेमकांत गायकवाड) लूट जनतेची...


मोफत वाटणं म्हणजेच गाजर दाखवून लुटणं.

प्रदीप पाटील गणपूर (जळगाव )




मच्छिंद्र रायसिंग गलंगी तालुका चोपडा

(संपादक : हेमकांत गायकवाड)


लूट जनतेची करण्या साठी काढलेली किमया असंच वाटतं.ज्या पद्धतीने मोबाईल कंपन्या यांनी अगोदर सिमकार्ड मोफत वाटले आणि नंन्तर आता भरमसाट लूट करताय. सुरवातीला सिमकार्ड फुकट, नेट फुकट, इन्कमिंग फ्री,अशी लुभावण करतं. आता एक सेकंद सुद्धा काहीच फ्री नाही.उलट जनतेचे नेट उरलेलं गिळून टाकतात. महिना सरासरी 30 दिवसाचा पण या लुटारू कपंनी यांनी 28 दिवसाचा करून टाकला. 13 महिन्याचे वर्ष करून टाकले.सरकारी धोरण त्यांच्या बाजूनं. व्यापारी अन सरकार एक माळेचे मणी झालेत. जनतेला विविध मार्गानं लुटायचं हाच उधोग दोघांचा. सुरवातीला योजना मोफत म्हणून गोंडस नाव देऊन आणायच्या आणि नंन्तर पद्धतशीर मानेवर सूरी चालवायची असाच लूट धंदा मांडला उधोगपती आणि सरकार यांनी. कपंनी 28 दिवसाचा महिना सांगते तर सरकार बोलत का काही? तर कारण लुच्ची , ढोंगी, लबाड जनसेवक झालीत.कोणी कोणाला बोलायचं नाही. अशीच पद्धत सर्व ठिकाणी हे पद्धतशीर लुटताय. फ्री एकावर एक मोफत. एकाची किंमत दोघांच्या वर ठेवायची असं व्यापारी करतात आणि वरून शाळसुधा सारखं सांगायचं.जनतेला मदत व्हावी म्हणून,जनते साठी, असं काहीतरी सांगायचं.निव्वळ खोटारडी यंत्रणा झाली. सरकार नेकर प्रणाली इतकी केली कि जनता महागाई ने होरपडून निघतेय. गॅस योजना बघा सरकार ने गॅस कनेक्शन मोफत वाटले आणि गॅस सिलेंडर किंमत दुप्पट करून टाकली. अश्या अंनत योजना दोघं मिळून चालवतात. लाडकी बहीण,मोफत धान्य,किसान योजना, हया सारख्या योजना राबवायच्या आणि त्यांना कैक पटीने लुटायचं. वाटायचं म्हणून "स्वास्त घ्या अन मुक्त दया"शेतकऱ्यांचा माल स्वस्त घ्यायचा अन फुकट दयायचा. शेतकरी मेला तरी चालेल असं धोरण. सरकार ईतर मार्गाने अंनत पटीत कर प्रणाली वाढवून जनता पिळतेय असं दिसतं. रोज रक्त शोषण करायचं अन वरून सांगायचं आम्ही जनतेला चांगलं जगवण्या साठी विविध योजना राबवतो असं सांगायचं.जिथे जिथे सरकार गरिबांच्या साठी म्हणून एक योजना आणते तिथं तिथं दुसऱ्या अनेक मार्गाने गरिबांना लुटून त्यांचा पैसा खिशात घालते. मोफत प्रवास, अर्ध भाडे, हि योजना सुद्धा आता कार्ड सुरु करून कार्ड मध्ये रक्कम भरायला पैसे कापायचे आणि कार्ड माध्यमातून अमाप पैसा फुकट त्यांच लोकांच्या कडून गोळा करून घ्यायचा. कार्ड मध्ये शिल्लक राहु द्यायच्या नावाने फुकट जनतेचा पैसा वापरायला करून घेतलेलं साधन केलं महामंडळ ने.गरीब वृद्ध महिलांना कार्ड काढतांना csc सेंटर वर लूट करतात. जास्तीचे पैसे लुटतात csc सेंटर वाले. शेतकऱ्यांना कमी किंमत मध्ये सबसिडी देतं खत देणं हया योजनेत सुद्धा तीच पद्धत. युरिया खतावर सूट दयायची आणि ईतर खतांच्या किंमती भरमसाठ ठेवायच्या. एक खताला सूट दयायची आणि दुसऱ्या दहा खत किंमत मधून लूट करायची असंच आहे. असे राजकीय पुढऱ्याचं सरकारी धोरण. अश्या कितीतरी योजना आहेत सरकार देतं असं दाखवतं अन त्यांच्याचं कडून दुसऱ्या मार्गानं दुप्पट काढून घेतं. मग का जनतेला फसवणूक करण्या साठी अश्या योजना राबवतं असतात असं जनतेला प्रश्न पडायला लागलेत आता. कर वसुली इतकी करताय कि लोकं म्हणताय तुघलकी कारभार चाललाय. जनता पिळणं अन पैसा गिळणं झालं. ऑनलाईन बॅंकिंग सवय लोकांना लावली मोफत पैसा ट्रांसफर करायला लोकं लागलीत आणि मग आता बरोबर लुटायला उभं राहिलं सरकार. दोन हजार वर ट्रान्सफर फी लागेल. व्वा सरकार? बॅंक ऐटीएम मधून पैसे काढायला पण पैसे लागतील. पहिले दोन व्यवहार फुकट नंन्तर भरा पैसे. परस्पर कापून घेणार यांना कोण बोलणारं. लोकशाही आलीय देशात की पुन्हा इंग्रज किंवा मुगल राज्य आलं भारतीय जनतेला लुटायला तेच सध्या समजतं नाही. जनसेवा, जनसेवक, जनतेचा सालदार हि नाव खोडून आता लूट मालक, रक्त पिपासू सेवक अशीच ठेवावी लागतील असं दिसतं. सरकार पैसा गोळा करतांना पण जनतेला लुटते अन वाटताना पण लूट करते. समांतर आर्थिक व्यवस्था मध्ये पण भ्रष्टाचार मार्गानं पण सरकार जनतेला लुटतं असते. अन वरून अश्या पोकळ योजना काढून पण जनतेला लुटतं असते. खरोखर अश्या योजना काढण्या पेक्षा योग्य रीतीने महागाई कमी केली आणि जनतेला लूट करायचं थांबवलं. शेती मध्ये शेती पिकांना भाव दिला. शिक्षण, आरोग्य मोफत दिलं. योग्य किंमत मध्ये सर्व दिलं तर मोफत असं देतोय दाखवायचं काही कारण नाही. रास्त किंमत मध्ये खरेदी करा. विक्री करा. जेणे करून महागाई कमी होऊन जनता सुखी होईल. सध्या जनता इतकी दुःख करतेय दुःखी आहे. रोज लोकं शिव्या शाप देतं असतात. अर्धे चांगलं म्हणतात अर्धे वाईट. पण एवढं मात्र खरं "मोफत वाटणं म्हणजे लुटणं ". विविध योजना राबवताना त्या योजने साठी पैसा हा गोळा करावा लागतो तर तो पद्धतशीर पणे जनता लुटून घ्यायचा. नव्हे डाखा टाकुन हिसकावून घ्यायची बेमालून पद्धत. जनतेला सांगणं आहे सरकार च्या या योजना जनतेला लुटूनच चालणार आहेत. सरकार ने जागे होतं जन हिताचे निर्णय घेतांना जन धन योग्य पद्धतीने खर्च केलं पाहिजे.गोळा करतांना देतांना आणि घेतांना सात्विक मार्गानं सारं केलं पाहिजे. योग्य असेल तेच घ्यावं अन दयावं.जन भावना या लेखात.


प्रदीप मनोहर पाटील 

गणपूर जळगाव 

मो. 9922239055

No comments