adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शिवांगी बेकर्सच्या कामगार प्रतिनिधींचे व्यवस्थापनाला निवेदन; ले-ऑफ पद्धत बंद करा आणि २६ दिवस काम द्या

शिवांगी बेकर्सच्या कामगार प्रतिनिधींचे व्यवस्थापनाला निवेदन; ले-ऑफ पद्धत बंद करा आणि २६ दिवस काम द्या तालुका प्रतिनिधी खामगाव : पल्लवी पाटील...

शिवांगी बेकर्सच्या कामगार प्रतिनिधींचे व्यवस्थापनाला निवेदन; ले-ऑफ पद्धत बंद करा आणि २६ दिवस काम द्या



तालुका प्रतिनिधी खामगाव : पल्लवी पाटील 

(संपादक : हेमकांत गायकवाड)

खामगाव, दि. 8 जुलै २०२६ :खामगाव औद्योगिक वसाहतीतील नामांकित कंपनी मे. शिवांगी बेकर्स प्रा. लि. जनुना येथील कामगारांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी व्यवस्थापनाला अधिकृत प्रस्ताव सादर केला आहे. दि. ३० जून, २०२६ रोजी मागील तीन वर्षांचा करार संपुष्टात आल्यामुळे येणाऱ्या ३ वर्षासाठी म्हणजेच ३० जून, २०२९ पर्यंतच्या कालावधीसाठी हा नवीन प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

शिवांगी बेकर्स निर्वाचित कामगार प्रतिनिधी या नावाने हा प्रस्ताव बी.आय.आर. ॲक्ट नुसार सादर करण्यात आला असून, यावर कंपनीचा आवक शिक्का दि. ९-७-२६ रोजी घेण्यात आला आहे.

कामगार प्रतिनिधींच्या प्रमुख १६ मागण्या अशा :

या प्रस्तावात कामगारांनी पगारवाढीसोबतच इतर आवश्यक मागण्यांचा समावेश केला आहे.

पगारवाढ आणि वर्गवारी : कंपनीमधील कामगारांची अनुभवाप्रमाणे कुशल, अर्ध-कुशल आणि अकुशल अशी वर्गवारी करून पगारवाढ देण्यात यावी. कुशल कामगारास प्रतिदिन रु. २५०/-, अर्धकुशलास रु. २३०/- व अकुशल कामगारास रु. २००/- अशी पगारवाढ करण्यात यावी. तसेच वार्षिक वेतनवाढ मूळ पगाराच्या २० टक्के लागू करावी.

 कामाचे दिवस आणि कपात बंद करा :सध्या कार्यरत सर्व कामगारांना किमान २६ दिवसाचे काम मिळावे आणि ले-ऑफ पद्धत पूर्णपणे बंद करावी. तसेच मागील करारामध्ये बेकायदेशीररीत्या दररोज २० रु. कपात केली जात होती, ती कायमची बंद करावी.

रजेची सुविधा : सर्व कामगारांना वार्षिक वैद्यकीय रजा किमान १० दिवस, किरकोळ रजा १२ दिवस आणि हजेरी असलेल्या प्रत्येक १३ दिवसामागे एक दिवस अर्जित रजा देण्यात यावी. २६ जानेवारी, १५ ऑगस्ट व इतर सुट्ट्या ऐच्छिक स्वरूपात मिळाव्यात.

 इतर सोयी-सुविधा : प्रत्येक कामगाराचे सेवापुस्तक तयार करून ठेवावे, ओव्हरटाईमचा मोबदला सरकारी नियमानुसार डबलरेटने मिळावा, दर दोन वर्षातून २ नग गणवेश व सेफ्टी शूज पुरवावेत, चेंजिंग रूम व स्वतंत्र लॉकरची व्यवस्था करावी, सवलतीच्या दरात उपहारगृह, कामावर येण्या-जाण्यासाठी वाहन व्यवस्था आणि दिवाळीपूर्वी एकूण पगाराच्या २० टक्के बोनस देण्यात यावा.

तसेच कुटुंबासाठी घर बांधकाम, मुलांच्या शिक्षण, विवाह आणि आई-वडिलांच्या उपचारासाठी बँकेकडून रु. २,००,०००/- पर्यंतच्या कर्जास कंपनीने हमी द्यावी व महिला कामगारांना बालकपणाची रजा, पाळणा घराची व्यवस्था द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सदर मागण्यांवर लवकरात लवकर चर्चा होऊन दि. ०१ जुलै, २०२६ पासून हा करार लागू करावा, अशी विनंती कामगार प्रतिनिधी दीपक ह. सुलताने, विजय रा. मांडवेकर, जयसिंह वि. बघेल आणि सचिन शं. काटोले यांनी केली आहे.

No comments