adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपुरात २०११ पूर्वीपासून सरकारी जमिनीवर वास्तव्यास असलेल्या कुटुंबांसाठी विशेष कॅम्प शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमण नियमित करणे करिता आवश्यक प्रक्रिया

फैजपुरात २०११ पूर्वीपासून सरकारी जमिनीवर वास्तव्यास असलेल्या कुटुंबांसाठी विशेष कॅम्प शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमण नियमित करणे करिता आव...

फैजपुरात २०११ पूर्वीपासून सरकारी जमिनीवर वास्तव्यास असलेल्या कुटुंबांसाठी विशेष कॅम्प

शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमण नियमित करणे करिता आवश्यक प्रक्रिया 





इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


फैजपूर नगरपरिषदचे राष्ट्रीय काँग्रेसचे गटनेते शे इरफान शे इकबाल नगरसेवक यांच्या पाठपुराव्याला यश

 शहरातील प्रभाग क्रमांक ८ मध्ये सन २०११ पूर्वीपासून शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमण नियमित करणे करीता, यासाठी दिनांक ७/९/२०२६/ सोमवार रोजी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते संबंधित कुटुंबांना आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया, कागदपत्रे संदर्भातील मार्गदर्शन या कॅम्पच्या माध्यमातून देण्यात येऊन फॉर्म भरून घेण्यात आले यावेळी ६० ते ७० फार्म भरण्यात आले,

प्रभाग क्रमांक ८ मधील नागरिकांचा हा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. ही बाब लक्षात घेऊन लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ,दामिनी पवन सराफ तसेच नगरसेवक राष्ट्रीय काँग्रेसचे फैजपूर नगरपरिषदचे गटनेते यांनी मे २०२६ मध्ये प्रशासनाकडे निवेदन देऊन या प्रश्नासाठी पाठपुरावा सुरू केला होता. संबंधित शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमण नियमित करीता यासाठी त्यांनी प्रशासनाकडे सातत्याने मागणी केली.

या पाठपुराव्या नंतर प्रशासनाच्या वतीने प्रभाग क्रमांक ८ मध्ये विशेष कॅम्प आयोजित करण्यात आला या कॅम्पमध्ये पात्र लाभार्थी कुटुंबांची माहिती घेऊन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व पुढील प्रशासकीय कार्यवाही बाबत नगरसेवक पवन सराफ, इरफान शेख इकबाल , जगदीश महाजन , यांनी मार्गदर्शन केले,

अनेक वर्षांपासून सरकारी जमिनीवर वास्तव्यास असलेल्या कुटुंबांचे प्रश्न मार्गी लागण्याच्या दृष्टीने हा कॅम्प महत्त्वपूर्ण मानला जात आहे. त्यामुळे संबंधित नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह कॅम्पमध्ये उपस्थित राहून या संधीचा लाभ घेतला व या पुढे लाभ घ्यावा,असे आवाहन नगरेवक पवन अनिल सराफ, इरफान शेख इकबाल यांनी केले आलेल्या प्रमुख पाहुणेचे इरफान मेंबर तर्फे सत्कार व स्वागत करण्यात आले या वेळी नगरपरिषदचे उपनगराध्यक्ष विनोद चौधरी बांधकाम सभापती सागर होले काँग्रेसचे गटनेते शेख इरफान शेख इकबाल नगरसेवक पवन सराफ सामाजिक कार्यकर्ते शेख नईम शेख फयाज, शेख साबीर शेख शरीफ कामिल शेख अजीज,आरीफ शेख बाबु मेंबर,काँग्रेस शहराध्यक्ष रियाज पालिकेचे बांधकाम इंजिनियर जगदीश महाजन वास्तु सर्व्हे कन्सल्टन्सी,अमळनेर रोहित सोनार, मंगेश (श्याम) पाटील, महेश भावसार हे उपस्थित होते

No comments