adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

प्रायमल प्राईड सोसायटीत पहिला गणेश आगमन सोहळा मोठ्या उत्साहात

प्रायमल प्राईड सोसायटीत पहिला गणेश आगमन सोहळा मोठ्या उत्साहात मोशी (पुणे) प्रतिनिधी  (संपादक : हेमकांत गायकवाड) मोशी (पुणे) : मोशी येथील नव्...

प्रायमल प्राईड सोसायटीत पहिला गणेश आगमन सोहळा मोठ्या उत्साहात



मोशी (पुणे) प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


मोशी (पुणे) : मोशी येथील नव्याने स्थापन झालेल्या प्रायमल प्राईड सोसायटीमध्ये प्रथमच गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, गणपती बाप्पांचे आगमन मोठ्या थाटामाटात आणि भक्तिमय वातावरणात करण्यात आले.


सोसायटीमध्ये पहिल्याच वर्षी गणपती बाप्पांची स्थापना करण्याचा संकल्प काही सदस्यांनी केला. गणेशोत्सवासाठी अवघे तीन-चार दिवस शिल्लक असतानाही सोसायटीतील सदस्यांनी एकत्र येत उत्स्फूर्तपणे नियोजन केले. अल्पावधीतच सोसायटीतील रहिवाशांनी मोठ्या उत्साहाने लोकवर्गणी जमा करून गणेशोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


गणपती बाप्पांच्या आगमनानिमित्त सोसायटीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये महिला, पुरुष, लहान मुले तसेच सोसायटीतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल-ताशांचा गजर, फुलांची उधळण, भक्तांचा जयघोष आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या घोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.


नव्याने स्थापन झालेल्या सोसायटीचा हा पहिलाच गणेशोत्सव असल्याने रहिवाशांमध्ये विशेष उत्साह आणि आनंदाचे वातावरण होते. अल्पावधीत सर्वांनी एकत्र येऊन केलेले नियोजन आणि उत्स्फूर्त सहभाग यामुळे गणपती बाप्पांची आगमन मिरवणूक सर्वांसाठी अविस्मरणीय आणि भावनिक क्षण ठरली.


या गणेशोत्सवाच्या माध्यमातून सोसायटीतील रहिवाशांमध्ये एकता, आपलेपणा आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ झाली.


या उत्सवाच्या आयोजनासाठी अध्यक्ष विजय ठाकरे, उपाध्यक्ष सत्यम मिश्रा, सेक्रेटरी दत्तात्रय कदम, खजिनदार किरण कडु, महेंद्र पाटील, अक्षय नारखेडे, अजित साकोरे, प्रवीण पाटील, प्रशांत अहेर आणि शुभम गुंठे कुंदन माळी, परशुराम माळी यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांच्या सहकार्याने तसेच सोसायटीतील सर्व रहिवाशांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे प्रायमल प्राईड सोसायटीचा पहिला गणेश आगमन सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.


🚩 गणपती बाप्पा मोरया!

मंगलमूर्ती मोरया! 🚩

No comments