adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रावेर तालुक्यात भुकंप! मोहगण-अहिरवाडीसह परिसरात बसला सौम्य धक्का!

 रावेर तालुक्यात भुकंप! मोहगण-अहिरवाडीसह परिसरात बसला सौम्य धक्का!   रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) रावेर तालुक्य...

 रावेर तालुक्यात भुकंप! मोहगण-अहिरवाडीसह परिसरात बसला सौम्य धक्का! 

 रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

रावेर तालुक्यातील मोहगण-अहिरवाडीसह परिसरात दिनांक सप्टेंबर मंगळवार रोजी पहाटेच्या सुमारास सुमारे 7 वाजून 57 मिनिटांनी परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता 3.3 रिश्टर स्केल इतकी असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. अचानक जाणवलेल्या धक्क्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. भूकंपाचा केंद्रबिंदू गंगापुरी धरणाजवळ जमिनीखाली असल्याचे सांगण्यात येत आहे. धक्का सौम्य स्वरूपाचा असल्याने आतापर्यंत कोणतीही मोठी जीवितकिंवा

वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. सकाळी वेळेस अचानक जमिनीला हादरा जाणवल्याने मोहगण, अहिरवाडीसह आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. रावेर तहसील चे प्रभारी तहसीलदार संजय तायडे यांनी भूकंप झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.भुकंपाचा धक्का जाणवला असून कुठल्याही प्रकारची वित्तहानी किंवा जीवीतहानी झाली नसल्याचे स्पष्ट करीत भूकंपाची तीव्रता कमी असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. प्रशासन दक्ष असून प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून मिळणाऱ्या अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments