कठोरा शाळेत आनंददायी शनिवार चित्र कला परीक्षेचे आयोजन अडावद प्रतिनिधी रविंद्र कोळी (संपादक : हेमकांत गायकवाड) श्री छत्रपती शि...
कठोरा शाळेत आनंददायी शनिवार चित्र कला परीक्षेचे आयोजन
अडावद प्रतिनिधी रविंद्र कोळी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल, कठोरा ता चोपडा येथे अलीकडेच 'आनंददायी शनिवार' उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विशेष चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व सृजनात्मकतेला प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेत श्री गणेशाची चित्र काढणे व रंगवणे हा मुख्य विषय ठेवण्यात आला होता. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी अत्यंत सुबक, सुंदर आणि मोहक चित्रे साकारली.
विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आपल्या कलेचे सुंदर दर्शन घडवले. या चित्रकला स्पर्धेत उत्कृष्ट चित्र काढल्याबद्दल खालील विद्यार्थ्यांची प्रथम क्रमांकासाठी निवड करण्यात आली व त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
रितू बारेला (इयत्ता पाचवी),ईश्वर पाटील (इयत्ता सहावी),भूमिका उमाडे (इयत्ता सातवी),भावेश धनगर (इयत्ता आठवी),रंगिता बारेला (इयत्ता नववी),अंजली बारेला (इयत्ता दहावी),स्पर्धेच्या यशस्वी समाप्तीनंतर शाळेच्या वतीने विजेत्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना आकर्षक बक्षीसांचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक . सुनील पाटील, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्पर्धेचे पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली व मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा आणि बक्षीस वाटपाचे नियोजन शाळेचे शिक्षक . संदीप अहिरे यांनी अत्यंत यशस्वीरीत्या केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला असून, शिक्षक व पालकांकडून विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे
या कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले
फोटो कॅप्शन कठोरा ता चोपडा येथील - श्री छत्रपती शिवाजी हायस्कुल येथे चित्रकला स्पर्धा आयोजीत करण्यात आली त्या प्रसंगी विद्यार्थी व शिक्षक आदी मान्यवर


No comments