adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सदाचाराच्या आचरणातूनच माणसाचे कल्याण... - केशव कांबळे

सदाचाराच्या आचरणातूनच माणसाचे कल्याण... - केशव कांबळे लातूर,जि. प्र. (उत्तम माने ) (संपादक : हेमकांत गायकवाड) भाद्रपद पौर्णिमेनिमित्त वैशाली...

सदाचाराच्या आचरणातूनच माणसाचे कल्याण... - केशव कांबळे





लातूर,जि. प्र. (उत्तम माने )

(संपादक : हेमकांत गायकवाड)


भाद्रपद पौर्णिमेनिमित्त वैशाली बुद्ध विहार येथे बुद्ध वंदना व धम्मप्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या सदाचाराच्या मार्गाचे आचरण केल्यानेच व्यक्तीचे व समाजाचे कल्याण साधता येते, असे प्रतिपादन केशव कांबळे यांनी केले.

ते म्हणाले, मानवी जीवनात कोणत्याही प्राण्याची हत्या न करणे, कोणालाही शारीरिक अथवा मानसिक दुःख न देणे, चोरी न करणे, स्वेच्छेने दिलेले तेवढेच स्वीकारणे, नैतिक आचरण करणे तसेच खोटे न बोलता सत्याचा मार्ग स्वीकारणे, ही सदाचाराची मूलभूत तत्त्वे आहेत. या तत्त्वांचे पालन केल्यास व्यक्तीचे जीवन अधिक सुसंस्कृत आणि समाज अधिक शांततामय होण्यास मदत होते.

आज समाजात चोरी, खून, अत्याचार यांसारख्या घटनांमुळे असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत भगवान बुद्धांचा सदाचार, करुणा आणि नैतिकतेचा विचार समाजात रुजविण्याची गरज आहे. समाजाला घातक ठरणारे आचरण टाळून प्रत्येकाने सदाचाराचा मार्ग स्वीकारला, तर सामाजिक स्वास्थ्य निर्माण होण्यास हातभार लागेल, असेही कांबळे यांनी नमूद केले.

बुद्ध धम्म वर्षावास व पुनीत सुसंस्कार पर्वाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमाच्या प्रारंभी भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदना घेण्यात आली. बुद्ध विहारासाठी आवश्यक वस्तूंचे दान करणारे दीपक बोरे व भरत कांबळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

दरम्यान, माऊली मिरची मसाले फर्मचे बालाजी कांबळे यांच्या वतीने उपस्थितांसाठी खीरदान करण्यात आले. कार्यक्रमास बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी धम्मपालन गाथेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

No comments