adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मोठा वाघोदा येथील यशवंत नगरातील गटार सफाई करण्याची मागणी. गटारींची साफसफाई न झाल्यास वरिष्ठांकडे तक्रार करणार.

मोठा वाघोदा येथील यशवंत नगरातील गटार सफाई करण्याची मागणी. गटारींची साफसफाई न झाल्यास वरिष्ठांकडे तक्रार करणार. रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी ...

मोठा वाघोदा येथील यशवंत नगरातील गटार सफाई करण्याची मागणी.

गटारींची साफसफाई न झाल्यास वरिष्ठांकडे तक्रार करणार.




रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा बुद्रुक येथील बसस्थानक परिसर शेजारच्या यशवंत नगर परिसरातील गटारींची अवस्था अद्यापही अत्यंत खराब असून गटाराची योग्य प्रकारे साफसफाई झालेली नाही. याबाबत ग्रामपंचायतीला वारंवार सांगूनही अद्याप ठोस कार्यवाही झाली नसल्याची तक्रार संबंधित परिसरातील रहिवासी कुलदीप अनिल पवार यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली आहे 

गटार तुंबल्यामुळे परिसरात घाण, दुर्गंधी व अस्वच्छता निर्माण झाली असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायतीची ही जबाबदारी असतानाही या समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे.

तरी ग्रामपंचायतीने तातडीने गटाराची संपूर्ण साफसफाई करून कचरा व गाळ हटवावा आणि परिसर स्वच्छ करावा. अन्यथा संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत लेखी तक्रार करण्यात येईल.

नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा प्रश्न असल्याने तातडीने कार्यवाही करावी.

याची तक्रार कुलदीप पवार यांनी केली आहे

No comments