adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आबासो श्रीराम सोनवणे पाटील शैक्षणिक फाउंडेशनचा अभिनव उपक्रम

आबासो श्रीराम सोनवणे पाटील शैक्षणिक फाउंडेशनचा अभिनव उपक्रम हातेड, ता.चोपडा प्रतिनिधी  (संपादक : हेमकांत गायकवाड) आबासो श्रीराम सोनवणे पाटील...

आबासो श्रीराम सोनवणे पाटील शैक्षणिक फाउंडेशनचा अभिनव उपक्रम






हातेड, ता.चोपडा प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)

आबासो श्रीराम सोनवणे पाटील शैक्षणिक फाउंडेशन व श्री शिवाजी आदर्श प्राथमिक केंद्र शाळा, हातेड यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा, इयत्ता पहिली पाटी वाटप व शैक्षणिक व्याख्यानाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी *आबासो श्रीराम सोनवणे* होते. यावेळी सामान्य ज्ञान स्पर्धेतील यशस्वी व शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना *श्री. अमेय रमेशराव सोनवणे (प्रोजेक्ट मॅनेजर, ॲबोट, आयर्लंड - युरोप)* यांच्याकडून प्रशस्तीपत्र, ट्रॉफी, बक्षिसे, शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. याचवेळी *इयत्ता १ ली च्या विद्यार्थ्यांना पाट्या व खाऊ वाटप* करण्यात आले. शाळेतील विद्यमान गुरुजनांचाही सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी श्री. आर. एस. सोनवणे (सेवानिवृत्त असि. डायरेक्टर, आकाशवाणी व दूरदर्शन) यांचे "शिक्षणाचे बदलते स्वरूप व आपली जबाबदारी" या विषयावर शैक्षणिक व्याख्यान झाले.

या शाळेच्या २०१८ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमास उपस्थिती देऊन सहकार्य केले, त्यांचा सत्कार दादासो रमेश सोनवणे यांनी केला. तर वर्गशिक्षिका रेखा पाटील यांच्याकडून त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या.

यावेळी रमेश नाना, वासुदेव बाविस्कर (मा. प्राचार्य पिलखोड), सुनिल सोनवणे (निवृत्त ग्रा.पं. अधिकारी), बापूसाहेब देविदास शंकर सोनवणे, आबासो अशोक सनेर, व्यवस्थापन समिती अध्यक्ष मुकेश दादा सोनवणे, दादासाहेब मनोज सनेर, भाऊसाहेब नंदकुमार सोनवणे, केंद्रप्रमुख संदीप बाविस्कर सर, मुख्याध्यापक आबासो पी. सी. पाटील, पंजाबराव बाविस्कर सर, माजी सरपंच कैलास सोनवणे, विकास सोसायटी चेअरमन गिरीष सोनवणे, व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष देवका सोनवणे, गणेश कुंभार, सोनवणे ताई व सर्व सदस्य, पालक,मुख्याध्यापक अहिरे सर,शिक्षक प्रदिप बोरसे सर, खैरनार सर, अमृत पाटील सर विद्यार्थी उपस्थित होते. तसेच सुनंदन बहुउद्देशीय संस्थेची उपस्थिती होती.






कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा पाटील तर प्रास्ताविक संदीप सनेर सर यांनी केले.शिंदे मॅडम यांनी आभार मानले.

No comments