adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आरोग्य विभागाची मोठा वाघोदा ग्रामपंचायतीला नोटीस! जिल्हा आरोग्य अधिकारी पथका सह दाखल. गावात स्वच्छता फवारणी पाणी पुरवठा व्हॉल ताबडतोब दुरुस्ती करण्याची सुचना

आरोग्य विभागाची मोठा वाघोदा ग्रामपंचायतीला नोटीस! जिल्हा आरोग्य अधिकारी पथका सह दाखल. गावात स्वच्छता फवारणी पाणी पुरवठा व्हॉल ताबडतोब दुरुस...

आरोग्य विभागाची मोठा वाघोदा ग्रामपंचायतीला नोटीस!

जिल्हा आरोग्य अधिकारी पथका सह दाखल.

गावात स्वच्छता फवारणी पाणी पुरवठा व्हॉल ताबडतोब दुरुस्ती करण्याची सुचना







रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


 मोठा वाघोदा बुद्रुक तालुका रावेर येथील साफसफाई अभावी गावात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य गटारी तुंबल्याने कचऱ्याचे ढीग साचले ,डासांचा प्रादुर्भाव वाढला डास निर्मुलनासाठी किटक नाशक औषधे व धूर फवारणी करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली होती या बाबतीत सलग दोन वेळा 

वृत्तपत्रांमध्ये बातमी प्रसिद्ध झाली या बातमीची दखल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भायेकर व हिवताप अधिकारी यांनी तातडीने दखल घेऊन मोठा वाघोदा येथे धाव घेत जलकुंभ शाळा व गावातील वस्त्यांमध्ये तसेच परिसरातील कचऱ्याचे ढीग आणि पुरवठा लाईनचे लिकेज व ठीक ठिकाणी असलेले उकिरडे समक्ष बघितले व ग्रामपंचायतला नोटीस पत्र दिले


निंभोरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी मोठा वाघोदा ग्रामपंचायत ग्रामपंचायत अधिकारी /सरपंच यांच्या नावाने दिलेल्या पत्र

जेए क्र. आरोग्य/आरआर ५१/२०/६

 गावातील व टाकी परिसर स्वच्छता व पाणी पुरवठा त्रुटि बाबत पत्राद्वारे खालील प्रमाणे 

नमूद केले की 

वरील विषयास अनुसरून आपणास कळविण्यात येते की, आपल्या गावातील निंभोरा रोड पुला बरील घाणीचे साम्राज्य आहे. याब‌द्दल आपणास वारंवार पत्र दिले आहे व तोंडी सूचना दिल्या आहे. असे असतांना सुध्दा आपण वरील विषयास लक्ष्य दिले नाही तसेच पाणी पुरवठा टाकी सभोवताल चा परिसर वा उकिरडे अजूनही जसेच्या तसे आहे वरील बाब ही जनतेच्या आरोग्यास धोकादायक आहे. जिल्हा हिवताप अधिकारी स्वत वरील स्थळी येऊन अत्यंत नाराजी व्यक्त केली. मागील वर्षी आपल्या निष्काळजी मुळे साथ लागून लोकांना खूप त्रास सहन करावा लागला आहे पुन्हा अशी घटना घडू नये म्हणून वरील विषयास तातडीने लक्ष्य द्‌यावे व वरील ठिकाणी घाण साचू देऊ नये


तसेच, खुशाल झिपरू सुपे यांच्या वाड्‌या जवळील व्हॉल गळती आहे त्वरित दुरुस्त करावी


1. संपूर्ण गावात धूर फवारणी करण्यात यावी


2. गटारी वाहत्या करण्यात याव्या।


3. गावातील उकिरडे उचलण्यात यावे


4. आठवड्‌यातून एकदा कोरडा दिवस पाळण्यासाठी दवंडी द्यावी


5. गावात रोज TCL युक्त पाणी पुरवठा करण्यात यावा.


6. पाणी पुरवठा टाकी कमीतकमी तीन महिन्यातून एकदा TCL चा वापर करून स्वच्छ धुऊन घ्यावी.


7. साचलेल्या डबक्यात क्रूड ऑइल टाकणे.


वरील प्रमाणे आपल्या गावात जलजन्य व कीटक जन्य साथीचे आजार पसरणार नाही म्हणून वरील उपाय योजना आपल्या स्थरावरून उद्धपातळीवर करण्यात याव्या. तसे न केल्यास होणाऱ्या परिणामास ग्राम पंचायत स्वतः जबाबदार राहील याची आपण नोंद घ्यावी. 

म. कळावे,

वैद्यकिय अधिकारी

निंभोरा प्राथमिक आरोग्य केंद्र 

माहितीसाठी प्रत रवाना 

१. गटविकास अधिकारी अधिकारी, पंचायत समिती रावेर 

2. मा. तालुका वैद्यकीय अधिकारी रावेर

३. माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा जळगाव

4. मा. जिल्हा हिवताप अधिकारी जळगाव,

यांना पाठविण्यात आले असल्याचे नमूद केले आहे 

आरोग्य विभागाने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पाहणी केली संसर्गजन्य संशयास्पद कर्तव्य कार्य करणाऱ्या काही सुचना लेखी नोटीस बजावून सांगितले आहे ग्रामपंचायत प्रशासन जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा हिवताप अधिकारी तालुका वैद्यकीय अधिकारी तसेच सर्व वैद्यकीय अधिकारी यांच्या सुचना व लेखी नोटीस पत्र किती गांभीर्याने घेतील की आरोग्य विभागाच्या या नोटीसीला केराची टोपली दाखवतील याकडे नागरिक लक्ष वेधून आहेत.

No comments