adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आमदार अमोलदादा जावळे यांच्या प्रयत्नांमुळे यावल नगरपरिषदेला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी १.९६ हेक्टर जमीन मंजूर.

आमदार अमोलदादा जावळे यांच्या प्रयत्नांमुळे यावल नगरपरिषदेला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी १.९६ हेक्टर जमीन मंजूर. यावल तालुका प्रतिनिधी : ...

आमदार अमोलदादा जावळे यांच्या प्रयत्नांमुळे यावल नगरपरिषदेला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी १.९६ हेक्टर जमीन मंजूर.




यावल तालुका प्रतिनिधी : भरत कोळी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


यावल शहरातील सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. शहरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी गट क्रमांक १२३३ मधील एकूण ९.२८ हेक्टर क्षेत्रापैकी १.९६ हेक्टर जमीन यावल नगरपरिषदेला उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हाधिकारी, जळगाव यांनी दिले आहेत. आमदार अमोल जावळे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यामुळे यश आले आहे.

नगरोत्थान महाअभियान तसेच स्वच्छ महाराष्ट्र अभियान २.० अंतर्गत सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी १.२५ हेक्टर, तर जलशुद्धीकरण केंद्रासाठी ०.७१ हेक्टर, अशी एकूण १.९६ हेक्टर जमीन नगरपरिषदेला प्राप्त झाली आहे.

मंजूर झालेल्या जागेवर मलजल प्रक्रिया केंद्र (STP), संबंधित आवश्यक संरचना, मलजल वाहिनीचे जाळे तसेच नाला अडवणे व वळवणे यासह विविध कामे प्रस्तावित आहेत. या प्रकल्पामुळे शहरातील सांडपाणी प्रक्रिया न करता नदी, नाले किंवा जलस्रोतांमध्ये मिसळण्याचे प्रमाण कमी होऊन जलप्रदूषणाला आळा बसण्यास मदत होणार आहे.

१२५ कोटींच्या भुयारी गटार योजनेला चालना

यावल शहरातील भुयारी गटार योजनेसाठी १२५ कोटी रुपयांची तांत्रिक मान्यता प्राप्त झाली आहे. या योजनेतील सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे काम स्वच्छ महाराष्ट्र अभियान २.० अंतर्गत प्रथम टप्प्यात करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक जमीन उपलब्ध होणे हा प्रकल्पाच्या अंमलबजावणीतील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.सांडपाणी 

व्यवस्थापनाचा प्रश्न सुटण्याची अपेक्षा यावल 

शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. आता STP प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध झाल्याने या प्रश्नाच्या कायमस्वरूपी निराकरणाच्या दिशेने ठोस पाऊल पडले आहे.

या संपूर्ण प्रक्रियेसाठी आमदार अमोल जावळे यांनी सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा केला.त्यांच्या प्रयत्नातून जमीन उपलब्ध झाल्याने यावल शहरातील सांडपाणी व्यवस्थापनाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास शहरातील नागरिकांना स्वच्छ,आरोग्यदायी व प्रदूषणमुक्त वातावरण मिळण्यास मोठी मदत होणार आहे.

No comments