किसान महाविद्यालयात पर्यावरण पूरक गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळा संपन्न छाया:कार्यशाळेप्रसंगी प्रा.डॉ.जी.एच.सोनवणे,अधिक्षिका यामीनी जटे,प्रश...
किसान महाविद्यालयात पर्यावरण पूरक गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळा संपन्न
छाया:कार्यशाळेप्रसंगी प्रा.डॉ.जी.एच.सोनवणे,अधिक्षिका यामीनी जटे,प्रशिक्षक डाॅ.चंद्रकांत सातपुते आणि आदी मान्यवर
पारोळा प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
पारोळा येथील किसान महाविद्यालयात बुधवार दिनांक २ सप्टेंबर २०२६ रोजी राष्ट्रीय सेवा योजना एकक आणि नगरपरिषद पारोळा यांच्या संयुक्त विद्यमान स्वच्छ सर्वेक्षण २०२६ आणि माझी वसुंधरा अभियान टप्पा ७.०० अंतर्गत एक दिवसीय पर्यावरण पूरक गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. एच. सोनवणे तर प्रमुख पाहुणे म्हणून पारोळा नगरपरिषदेच्या कार्यालयीन अधीक्षिका यामीनी जटे, सहाय्यक शुभम कंखरे, उपप्राचार्य डॉ. पी. डी. पाटील विभागीय समन्वयक डॉ. प्रदीप औजेकर होते. सदर कार्यशाळा प्रसंगी गणेश मूर्ती निर्मितीसाठी प्रशिक्षक म्हणून महाविद्यालयातील ग्रंथपाल डॉ. चंद्रकांत सातपुते होते. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी संवेदनशीलता निर्माण व्हावी आणि त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले असल्याचे मत रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. काकासाहेब गायकवाड यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ. जी. एच. सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे संतुलन राखणे ही काळाची गरज असून पीओपी पासून बनवलेल्या गणेश मूर्ती या पर्यावरणास हानिकारक असल्याने आजच्या कार्यशाळेत शाडू माती पासून आपण स्वतः बनवलेल्या गणपती मूर्तींची येत्या गणेश चतुर्थीला आपल्या घरी स्थापना करण्याचे आवाहन केले. कार्यशाळेचे विशेष आकर्षण म्हणजे या कार्यशाळेत पारोळा शहरातील टायगर इंटरनॅशनल प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला संघ व्यवस्थापक म्हणून स्वाती पाटील होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. शशिकांत पाटील यांनी तर आभार प्रा. शिरीष सूर्यवंशी यांनी मांडले

No comments