adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

घुसर बु.येथील अत्यावश्यक विकासकामांना निधी उपलब्ध करून द्यावा अतुल मुके यांची जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

घुसर बु.येथील अत्यावश्यक विकासकामांना निधी उपलब्ध करून द्यावा अतुल मुके यांची जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी...

घुसर बु.येथील अत्यावश्यक विकासकामांना निधी उपलब्ध करून द्यावा

अतुल मुके यांची जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी







मोताळा प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


मोताळा तालुक्यातील घुसर बु. येथील जिल्हा परिषद शाळेसह गावातील विविध अत्यावश्यक विकासकामांना प्रशासकीय मान्यता देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून देत ही कामे तातडीने मार्गी लावावीत, अशी मागणी श्री. अतुल मुके यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

घुसर बु. येथील नागरिकांच्या दैनंदिन गरजा तसेच विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शैक्षणिक सुविधांच्या दृष्टीने विविध विकासकामे अत्यंत आवश्यक आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने गावाची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक अंदाजपत्रक, तांत्रिक मान्यता व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करावी आणि पात्र शासकीय योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.निवेदनात जिल्हा परिषद शाळेची संरक्षण भिंत बांधणे, शाळेसाठी स्वतंत्र पोषण आहार कक्ष उभारणे, गावातील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणे तसेच नागरिक व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आवश्यक ठिकाणी प्रवासी निवारे बांधणे, या प्रमुख विकासकामांचा समावेश आहे.शाळेची संरक्षण भिंत उभारल्यास विद्यार्थ्यांची सुरक्षितता तसेच शाळा परिसराचे संरक्षण होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे पोषण आहार योजनेची अंमलबजावणी सुरक्षित व व्यवस्थित करण्यासाठी स्वतंत्र कक्षाची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.गावातील खराब अंतर्गत रस्त्यांमुळे पावसाळ्यात नागरिक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक व वाहनधारकांना होणारा त्रास लक्षात घेता रस्त्यांचे सर्वेक्षण करून काँक्रीटीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक ठिकाणी प्रवासी निवारे उभारण्यात यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.या सर्व विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित विभागामार्फत तातडीने आवश्यक कार्यवाही करावी आणि पात्र शासकीय योजनेंतर्गत निधी उपलब्ध करून कामांना प्रशासकीय मान्यता द्यावी, अशी मागणी श्री. अतुल मुके यांनी केली आहे.याबाबतचे निवेदन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बुलडाणा यांच्याकडे सादर करण्यात आले असून, त्याची प्रत जिल्हाधिकारी, बुलडाणा तसेच संबंधित विभागाकडे देण्यात आली आहे.

No comments