भालोद येथे धक्कादायक घटना; दोघांनी केली मित्राची हत्या दारूच्या नशेत नॉनव्हेज न मिळाल्याने डोक्यात दगड टाकून केला खून इदू पिंजारी फैजपूर...
भालोद येथे धक्कादायक घटना; दोघांनी केली मित्राची हत्या
दारूच्या नशेत नॉनव्हेज न मिळाल्याने डोक्यात दगड टाकून केला खून
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक : हेमकांत गायकवाड)
फैजपूर पोलिस स्टेशन हद्दीतील भालोद येथे नॉनव्हेज जेवण न दिल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मित्राच्या हत्येत झाल्याची धक्कादायक घटना फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भालोद येथे रविवारी रात्री घडली. दारूच्या नशेत झालेल्या वादा नंतर दोन मित्रांनी सहकारी मजूर असलेल्या मित्राच्या डोक्यात दगड घातल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी फैजपूर पोलिसांनी दोन संहितांना अटक केली आहे मात्र नेमके कारण अद्याप स्पष्ट केलेले नाही. रमेश ईश्वर सिंग भंवर ( वय 35 रा. खंडवा, मध्य प्रदेश ) असे मृत मजुराचे नाव आहे तर सुरज कोळी आणि सुरज उर्फ गोलू नेमाडे अशी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत.
नॉनव्हेजच्या जेवणावरून वाद
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रमेश भंवर सुरज कोळी आणि सुरज उर्फ गोलू नेमाडे हे तिघे मित्र असून मजुरी करून उदरनिर्वाह करत होते तिघांनाही एकत्र बसून दारू पिण्याची सवय होती. रविवारी रात्री सुमारे 8 ते 8:30 वाजेच्या सुमारास तिघे भालोद येथे दारू पीत बसले होते. दरम्यान रमेशने स्वतःच्या पैशातून आणलेले मासे एका मित्राकडे बनवण्यासाठी दिले होते नॉनव्हेजचे जेवण आपल्या वडिलांनाही द्यावे असा आग्रह सुरज कोळी याने धरल्याने रमेश आणि सुरज यांच्यात वाद झाला. वाद वाढल्यानंतर दोन्ही संशयतांनी रमेशच्या डोक्यात दगड घातल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. या हल्ल्यात रमेश चा मृत्यू झाला त्यानंतर आरोपींनी मृतदेह एम एस ई बी जवळील सुमारे 100 मीटर अंतरावरील एका खड्ड्यात टाकून घटनास्थळावरून पळ काढल्याचे सांगण्यात आले. सोमवारी सकाळी या घटनेची माहिती मिळताच फैजपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपासाची चक्रे गतिमान करीत दोन्ही संशयीतांना ताब्यात घेतले मृतदेह सवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलविण्यात आला आहे.

No comments