माकडाने अंगावर उडी मारून जखमी केलेल्या कोसगावच्या त्या महिलेचे निधन वनविभाग आता तरी माकडांचा बंदोबस्त करणार का ? यावल प्रतिनिधी (संपादक : ह...
माकडाने अंगावर उडी मारून जखमी केलेल्या कोसगावच्या त्या महिलेचे निधन
वनविभाग आता तरी माकडांचा बंदोबस्त करणार का ?
यावल प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
तालुक्यातील वनोली कोसगाव या गावांमध्ये माकडांच्या त्रासामध्ये ग्रामस्थ हैराण झाले असून गेल्या पंधरा दिवसापूर्वी एक माकड येथील एका महिलेच्या अंगावर उडी घेतली त्यात त्या खाली कोसळल्या रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना दवाखान्यामध्येऔषधोपचार सुरू असताना दिनांक 27 सप्टेंबर 26 रोजी औरंगाबाद येथे दवाखान्यात दुर्दैवी मृत्यू झाला .
सातपुड्याच्या जंगलात आता जंगल शिल्लक राहिले नाही त्यामुळे पशुपक्षी प्राणी हे शेत शिवारात वळलेले आहेत .कोसगाव वनोली येथे गेल्या सहा महिन्यापासून माकडांचा हैदोस सुरू असूनवनविभागाची कर्मचारी येतात आणि रिकामी हाती जनतेला भाषण देऊन परततात मात्र माकडांचा बंदोबस्त त्यांनी प्रखरीत्या केलेला नाही .
गेल्या पंधरा दिवसापूर्वी माकड अंगावर कुदल्याने सौ . कौशल्याबाई साहेबराव पाटील या खाली कोसळल्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने रक्त बंबाड अवस्थेतत्यांना दवाखान्यामध्ये हलवले गेल्या आठ-दहा दिवसापासून जळगाव आणि चार-पाच दिवसापासून औरंगाबाद येथे दवाखान्यामध्ये औषध उपचार सुरू होता .शेवटी त्यांचे प्राणोत्क्रमण झाले .या दुर्दैवी मृत्यूमुळे कोसगाव येथे शोक कळा पसरली .
वनोली -कोसगाव परिसरातदाट झाडी त्यामुळे माकड बिबटे हिंस्र प्राणीपशुपक्षी मोर लांडोर मोठ्या प्रमाणावर आढळतात माकड तर गावात दोन दोन तीन पिल्ले सोबत घेऊन घरांवर उड्या मारतातनव्हे तर हे माकड खाण्यासाठी नाही मिळाल्यास घरांमध्ये सुद्धा घुसून जातात शेतकरी वर्ग शेतात निघून गेल्यावर काही वृद्ध महिला घरी असतात माकडांना पाहून त्यांना दरवाजे बंद करून घरात थांबावे लागते वनविभागाचे कर्मचारी येतात माकडांना प्रेमापोटी काही खायला देऊ नका तरच ते गाव सोडतील अशी गोड सल्ला देऊन माकड पकडण्याचे धाडस न दाखवता निघून जातात .त्यांच्या तोंडून फक्त लेक्चर ऐका मात्र कारवाई शून्य -- !
आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांचे स्वीय सहाय्यक श्रीकांत यांच्याशी पत्रकार अरुण पाटील यांनी मेसेज टाकून संपर्क साधला या संदर्भात वनाधिकारी स्वप्निल फटांगरे यांना सुचित केले मोठमोठे बिबटे वाघ वनविभाग पकडू शकतात मग माकड का पकडू शकत नाहीत ? व त्यांना इतरत्र का हलवत नाहीत ?असा प्रश्न पत्रकार अरुण पाटील यांनी वनाधिकाऱ्यांना केला येत्या आठ दिवसाच्या आत या परिसरातील माकड इतरत्र कसे जातील याची उपाययोजना वनविभागाने करावी अन्यथा वरिष्ठांकडे दाद मागितली जाईल असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला .नव्हे तर मयत कौशल्याबाई साहेबराव पाटील यांचे मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या माकडाच्या घटनेमुळे यावल वनविभागाने त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय नियमानुसार अनुदान त्वरित अदा करण्यात यावेत अशी मागणी सुद्धा पत्रकार अरुण पाटील यांनी यावेळी केली .

No comments