adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा वर्षावास पुष्प चौदावे आडगाव संपन्न

चोपडा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा वर्षावास पुष्प चौदावे आडगाव संपन्न चोपडा तालुका प्रतिनिधी  (संपादक : हेमकांत गायकवाड) दी.बुद्धिस्ट सोस...

चोपडा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा वर्षावास पुष्प चौदावे आडगाव संपन्न



चोपडा तालुका प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


दी.बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जळगाव जिल्हा पूर्व अंतर्गत चोपडा तालुका यांच्या विद्यमाने राज्याच्या व जिल्ह्याच्या नियोजनानुसार आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा वर्षावास मालिका सुरू असून आडगाव ता.चोपडा येथील नालंदा बुद्ध विहारात वर्षावास प्रवचन मालिका पुष्प चौदावे गुफाण्यात आले.यावेळी आयु.ओंकार दत्तू जाधव (ज्येष्ठ पदाधिकारी भा.बौ.म)यांच्या अध्यक्षतेखाली वर्षावास कार्यक्रम संपन्न झाले.महिला उपासिका कल्पना धनराज बाविस्कर,स्नेहा ओंकार जाधव यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. तसेच त्रिशरण,पंचशील ग्रहण करून भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष दिवंगत धम्मदूत डी.एस.तायडे गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.*आजचा विषय - तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेले चार ब्रह्म विहार,भाद्रपद पौर्णिमा या विषयावर प्रवचनकार आयु. महेंद्र प्रल्हाद म्हैसरे सर (बौद्धाचार्य) यांनी मालिकेतले पुष्प पूर्ण करून धम्मदेसना दिली.* यावेळी आयु.भरत भिमराव शिरसाठ(शहराध्यक्ष )व आयु. शालिग्राम व्यंकट करंदीकर, वसंत बाबुराव शिंदे ,संजय श्रीपत साळुंखे(बौद्धचार्य )यांनी मार्गदर्शन केले.

      सदर वर्षावास कार्यक्रमासाठी शालिग्राम व्यंकट करंदीकर (प्रमुख,समता सैनिक दल), जानकीराम शंकर सपकाळे,वसंत बाबुराव शिंदे,रामचंद्र आखाडे सर, जिजाबाई रामचंद्र अहिरे, करुणा मच्छिंद्र सोनवणे, वर्षा प्रदीप पवार ,ऐश्वर्या प्रशांत अहिरे, यशोदाबाई गोलाईत, करुणा बाविस्कर, मनीषा सुकदेव बाविस्कर ,भागुबाई बाविस्कर, प्रमिलाबाई जाधव ,भूरसिंग हरी बाविस्कर ,प्रशांत यशवंत अहिरे(सदस्य ग्राम पंचायत),अमोल राजेंद्र पवार ,ताराचंद सोनवणे, आनंद भालेराव,अनिकेत बाविस्कर ,हिमांशु बाविस्कर, अजय बाविस्कर,तुषार मैराळे ,सागर वानखेडे आदी बौद्ध उपासक- उपासीका,भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन व प्रास्ताविक आयु. दिपक नाना भालेराव सर यांनी केले. शेवटी आभार रामचंद्र अमृत आखाडे सर यांनी मानले.

जयभीम! नमो बुद्धाय!!

No comments