adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात अभियंता दिन उत्साहात साजरा

चोपडा अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात अभियंता दिन उत्साहात साजरा चोपडा प्रतिनिधी  (संपादक : हेमकांत गायकवाड) चोपडा : महात्मा गांधी ...

चोपडा अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात अभियंता दिन उत्साहात साजरा


चोपडा प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती शरच्चंद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन), चोपडा येथे १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारताचे महान अभियंता सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव मा. डॉ. स्मिता संदीप पाटील होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून विभागप्रमुख – संगणक विभाग, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VIT), पुणे डॉ. संदिप आर. शिंदे,उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. संदिप आर. शिंदे यांनी “अशक्य असे काहीच नाही. आपण सर्वजण प्रयत्न, जिद्द आणि योग्य दिशेने काम करून निश्चितच काहीतरी चांगले करून दाखवू शकतो. विद्यार्थ्यांनी केवळ नोकरी मागणारे न बनता नोकरी देणारे बनण्याचे ध्येय ठेवावे,” असा प्रेरणादायी संदेश दिला. व सोशल मीडिया गोपनीयता व सुरक्षा यावर सखोल मार्गदर्शन केले. 

यावेळी अभियांत्रिकी समन्वयक प्रा. एम. एस. पाटील यांनीही मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना अभियंता दिनाचे महत्त्व, अभियांत्रिकी क्षेत्रातील बदलत्या संधी आणि कौशल्यविकासाबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. ॲड. संदीप सुरेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य प्रा. व्ही. एन. बोरसे यांनी आपल्या मनोगतात, “अभियांत्रिकी क्षेत्र हे देशाच्या प्रगतीचे प्रमुख साधन असून विद्यार्थ्यांनी ज्ञान, कौशल्य आणि नवकल्पनांच्या माध्यमातून देशाच्या विकासात योगदान द्यावे,” असे प्रतिपादन केले.

भारताचे महान अभियंता सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान, विविध संधी तसेच कौशल्यविकासाबाबत मार्गदर्शन मिळाले.

कार्यक्रमास अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन विभागातील उपप्राचार्य, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पी. के. चौधरी यांनी केले.

No comments