adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बोरावल रस्त्यात झाड कोसळल्याने सुमारे तासभर वाहतूक ठप्प; नगराध्यक्ष छायाताई पाटील यांची तत्परता

  बोरावल रस्त्यात झाड कोसळल्याने सुमारे तासभर वाहतूक ठप्प; नगराध्यक्ष छायाताई पाटील यांची तत्परता यावल प्रतिनिधी भरत कोळी  (संपादक : हेमकांत...

 बोरावल रस्त्यात झाड कोसळल्याने सुमारे तासभर वाहतूक ठप्प; नगराध्यक्ष छायाताई पाटील यांची तत्परता



यावल प्रतिनिधी भरत कोळी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


 जळगावहून -यावल येथे परतत असताना बोरावल गावाजवळ अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यासह पावसामुळे रस्त्यावर भलेमोठे झाड कोसळले. त्यामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सुमारे एक तास वाहतूक बंद राहिल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही आणि मोठी दुर्घटना टळली.

याच वेळी यावल नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. छायाताई अतुल पाटील व नगरसेवक अतुल पाटील हे त्या मार्गावरून जात होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले.

नगरपालिकेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच अतुल पाटील यांनी बोरावल येथील मित्र शांताराम धनगर, उमेश पाटील व अमोल राणा यांना तातडीने घटनास्थळी बोलावून घेतले आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

दरम्यान, नगराध्यक्षा छायाताई अतुल पाटील यांनी यावल नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून रेस्क्यू व्हॅन व जेसीबी तातडीने घटनास्थळी पाठविण्याच्या सूचना दिल्या. नगरपरिषदेचे कर्मचारी व जेसीबी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर छायाताई पाटील यांनी स्वतः घटनास्थळी थांबून राहून आवश्यक सूचना दिल्या. जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर कोसळलेले भलेमोठे झाड बाजूला करण्यात आले आणि काही वेळातच वाहतूक सुरळीत करण्यात आली.

अचानक आलेल्या नैसर्गिक संकटाच्या प्रसंगी नगराध्यक्ष छायाताई पाटील व नगरसेवक अतुल पाटील यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे अडकलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. बोरावल येथील नागरिक तसेच वाहनचालक व प्रवाशांनी त्यांच्या तत्परतेचे कौतुक करत आभार व्यक्त केले.

No comments