adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाची आढावा व संघटन बैठक संघटन मजबूत करण्यासाठी निष्ठावंत शिवसैनिकांशी संवाद; नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाची आढावा व संघटन बैठक संघटन मजबूत करण्यासाठी निष्ठावंत शिवसैनिकांशी संवाद; नवीन पदाधिकाऱ्यां...

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाची आढावा व संघटन बैठक

संघटन मजबूत करण्यासाठी निष्ठावंत शिवसैनिकांशी संवाद; नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या



किरण धायले प्रतिनिधी, अंतुर्ली/मुक्ताईनगर

(संपादक : हेमकांत गायकवाड)


मुक्ताईनगर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे व युवासेनाप्रमुख तथा शिवसेना नेते मा. आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात पक्षाची आढावा व संघटन बैठक रविवार, दि. १३ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली. शिवसेना उपनेते तथा रावेर लोकसभा संपर्कप्रमुख मा. गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीस शिवसेना, युवासेना, महिला आघाडी तसेच अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व निष्ठावंत शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


बैठकीत मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील पक्ष संघटनेचा आढावा घेण्यात आला. बूथ लेव्हल एजंट (BLA) नियुक्ती, रिक्त पदांवर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती तसेच आगामी काळात पक्ष संघटना अधिक सक्षम व मजबूत करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी निष्ठावंत शिवसैनिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेण्यात आल्या.


यावेळी मार्गदर्शन करताना उपनेते तथा रावेर लोकसभा संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ म्हणाले की, “आपल्याला कोणाचे नाव घेऊन राजकारण करायचे नाही किंवा कोणावर टीका करायची नाही. कोण काय करते याच्याशी आपल्याला देणेघेणे नाही. आपले लक्ष केवळ पक्ष संघटना मजबूत करण्यावर असले पाहिजे. पक्षाचे नेतृत्व आणि पक्षाचे प्रतिनिधी म्हणून आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत.”


पक्ष संघटना तळागाळापर्यंत पोहोचवून प्रत्येक शिवसैनिकाशी सातत्याने संवाद साधण्याचे आवाहनही त्यांनी केले. पक्षाच्या विचारांशी निष्ठावंत असलेल्या कार्यकर्त्यांना बळ देऊन आगामी काळात संघटनात्मक कामाला प्राधान्य देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


बैठकीस जिल्हाप्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व विद्यमान संचालक मा. योगिराज दादा पाटील, उपजिल्हासंघटक मा. अशोक दादा शिंदे, मलकापूर विधानसभा संपर्कप्रमुख मा. ललितजी मुथा, महिला आघाडी जिल्हाप्रमुख रावेर लोकसभा क्षेत्र तथा मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्र प्रमुख मा. प्रतिभाताई जगदाळे, तालुकाप्रमुख मा. ॲड. राहुल भाऊ पाटील, तालुका समन्वयक मा. ॲड. देवेंद्र बोदडे, बोदवड तालुकाप्रमुख मा. उपेंद्र भाऊ इंगळे, मुक्ताईनगर तालुका संघटक मा. डॉ. सुनील देवरे, मा. अक्षय पालवे, मा. रुपेश पाटील, संदिप डांगे, सद्दाम शाह, तालुका सोशल मीडिया (डिजी) समन्वयक मा. ॲड. अशोक दादा बोदडे, रावेर लोकसभा क्षेत्र सोशल मीडिया (डिजी) समन्वयक मा. जयवंत प्रभाकर चौधरी (राजपूत) यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.


नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार


यावेळी विधी व न्याय मुक्ताईनगर तालुकाप्रमुख म्हणून मा. ॲड. अशोक बोदडे, मुक्ताईनगर शहरप्रमुख मा. मुकेश कदम, तालुका सचिव मा. सुरज तळेकर, उपतालुकाप्रमुख मा. समाधान भाऊ भोलाने, मा. निवृत्ती भाऊ चिखलकर, मा. ऋषिकेश भाऊ मराठे यांच्यासह नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख योगिराज दादा पाटील व महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रतिभाताई जगदाळे यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.

No comments