चोपड्यात अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात पंचायत समिती ते बसस्थानक पुलापर्यंत पोलिसांचा बंदोबस्त; नगरपालिका प्रशासनाची कारवाई अशोक कोळी चो...
चोपड्यात अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात
पंचायत समिती ते बसस्थानक पुलापर्यंत पोलिसांचा बंदोबस्त; नगरपालिका प्रशासनाची कारवाई
अशोक कोळी चोपडा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा शहरातील रस्ते व सार्वजनिक ठिकाणी वाढलेल्या अतिक्रमणाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासनाच्या आदेशानुसार अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात करण्यात आली. नगरपालिका मुख्याधिकारी यांच्या आदेशानुसार पंचायत समिती परिसरापासून बसस्थानकाच्या पुलापर्यंत अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली.
या कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संबंधित ठिकाणी नगरपालिका प्रशासन व पोलीस यंत्रणेच्या उपस्थितीत अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करण्यात आली.
शहरातील रस्ते, फुटपाथ व सार्वजनिक जागा मोकळ्या करण्यासाठी प्रशासनाकडून ही मोहीम राबविण्यात येत असून, अतिक्रमणामुळे नागरिकांना होणारा त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या कारवाईमुळे परिसरातील वाहतुकीला शिस्त लागण्यास तसेच नागरिकांना ये-जा करण्यासाठी अधिक मोकळी जागा उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. अतिक्रमणाविरोधातील कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
--------------------------------------------------------------------
आज चोपडा नगरपालिकेमार्फत चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या संयुक्त उपस्थितीत चोपडा बस स्टॅन्ड ते उपजिल्हा रुग्णालय चोपडा पर्यंत अतिक्रमण काढण्यात आले सदर मोहिमेत पोलीस निरीक्षक देसले यांनी सांगितले की सदर जागेवर कोणीही परत कायमस्वरूपी अतिक्रमण केले तर यांच्यावर भारतीय न्याय संहिता अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी
पवन देसले पोलीस निरीक्षक, शहर पोलीस स्टेशन चोपडा


No comments