रावेर पंचक्रोशीत बैल पोळा सण उत्साहात साजरा रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीत महत्...
रावेर पंचक्रोशीत बैल पोळा सण उत्साहात साजरा
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीत महत्त्वाचा असलेला बैल पोळा सण आज गावागावात मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. शेतकन्यांचा जीव की प्राण असलेल्या बैलांची पूजा करून त्यांना आंघोळ घालून, रंगरंगोटी करून, हार-तुरे घालून शेतकरी बांधवांनी त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात येतो. या सणाची सुरूवात बैलपोळ्याच्या एक दिवस अगोदर सुरूवात होते. बैलपोळ्याच्या एकदिवस अगोदर मातीचे बैल बनवून त्याची पुजाअर्चना केली जाते व त्यांना नैवेद्य केला जातो. त्याच दिवशी म्हणजे बैलपोळ्याच्या एक दिवस अगोदर बैलांची पुजा केली जाते त्याला खांदशेकणी असे म्हणतात.
कारण वर्षभर बैलांना शेतकरी राबवितो अशा परिस्थितीत त्यांच्या खांद्याला अनेक जखमा होतात. म्हणुनच म्हणतात कुणाचे ओझे कुणाच्या खांद्यावर अशी जी म्हण आहे ती सत्य आहे. देशातील करोडो लोकांना अन्न पुरवठा व्हावा या उद्देशाने बैल पोळा हा सण केवळ बैलांचा नसून शेतकन्यांच्या कष्टाचा सन्मान आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचा उत्सव आहे.
पोळा सण सर्व नागरिकांनी एकत्र येऊन बैल पोळा मोठया आनंदात, पारंपरिक पद्धतीने साजरा केला.


No comments