श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध - आमदार हेमंत ओगले मतदारसंघात १ कोटी ९० लक्ष रुपयांच्या कामाचा शुभारंभ व लोकार्पण सोह...
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध - आमदार हेमंत ओगले
मतदारसंघात १ कोटी ९० लक्ष रुपयांच्या कामाचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा संपन्न
शौकतभाई शेख / श्रीरामपूर
(संपादक : हेमकांत गायकवाड)
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार हेमंत ओगले यांनी केले.
आमदार हेमंत ओगले यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या मौजे गुजरवाडी, वांगी, खीर्डी, कारेगाव येथील सुमारे १ कोटी ९० लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा आयोजित केला होता.
यावेळी आमदार ओगले म्हणाले की, मतदार संघातील विकास कामांसाठी आपण शासन दरबारी प्रयत्नशील आहोत. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या योजनांच्या माध्यमातून मतदार संघातील महत्त्वपूर्ण रस्त्यांची कामे प्रस्तावित केले असल्याचे सांगितले.
नगराध्यक्ष करण ससाणे म्हणाले की, गेल्या दिड वर्षांच्या कार्यकाळात मतदार संघात आमदार हेमंत ओगले यांनी विकास कामांचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला असल्याचे म्हटले.
जिल्हाध्यक्ष सचिन गुजर म्हणाले की, आमदार हेमंत ओगले यांच्या माध्यमातून मतदार संघात मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरू आहेत. त्यामळे ग्रामीण भागातील अनेक महत्वाचे विकास कामे मार्गी असल्याचे म्हटले.
उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे म्हणाले की, जनतेच्या कामना प्राधान्य देणारा लोकप्रतिनिधी आमदार हेमंत ओगले यांच्या रूपाने मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी सभापती बाबासाहेब दिघे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे, तालुकाध्यक्ष प्रमोद भोसले यांच्यासह गावातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

No comments