adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

‘लोकसंवाद-2026’ उपक्रमांतर्गत ज्येष्ठ नागरिक, महिलांसाठीच्या योजनांची नागरिकांना माहिती

‘लोकसंवाद-2026’ उपक्रमांतर्गत ज्येष्ठ नागरिक, महिलांसाठीच्या योजनांची नागरिकांना माहिती अहिल्यानगर / जिमाका वृत्तसेवा (संपादक : हेमकांत गायक...

‘लोकसंवाद-2026’ उपक्रमांतर्गत ज्येष्ठ नागरिक, महिलांसाठीच्या योजनांची नागरिकांना माहिती





अहिल्यानगर / जिमाका वृत्तसेवा

(संपादक : हेमकांत गायकवाड)


गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, लोककल्याणकारी निर्णय आणि जनहिताच्या उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद-2026’ या विशेष जनजागृती उपक्रमांतर्गत कोपरगाव येथे शासकीय योजनांचा जागर करण्यात आला. गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असलेल्या ठिकाणी शासकीय योजनांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली.

जिल्हा माहिती कार्यालय, अहिल्यानगर आणि कोपरगाव येथील श्रद्धानगरी व जोशीनगर गणेशोत्सव मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात तहसीलदार महेश सावंत यांनी ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. योजनांची पात्रता, उपलब्ध सुविधा आणि लाभ घेण्याची प्रक्रिया याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. पात्र नागरिकांनी आपल्या गरजेनुसार शासकीय योजनांची माहिती घेऊन पात्रतेनुसार योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी ‘लोकसंवाद-२०२६’ या उपक्रमाची भूमिका व उद्देश स्पष्ट केला. शासकीय योजनांची माहिती केवळ जाणून घेणे नव्हे, तर पात्रतेनुसार त्यांचा लाभ घेणे आणि या योजनांची माहिती कुटुंबातील तसेच परिसरातील इतर नागरिकांपर्यंत पोहोचविणे, हा ‘लोकसंवाद’ उपक्रमाचा महत्त्वाचा उद्देश आहे. शासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी अशा उपक्रमांतून जनजागृतीला चालना मिळते, असेही श्री. चिलवंत यांनी नमूद केले.

यावेळी स्वच्छतादूत व पर्यावरणप्रेमी सुशांत घोडके यांनी स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि नागरिकांची सामाजिक जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले. परिसराची स्वच्छता राखणे, पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन देणे तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेबाबत नागरिकांनी जागरूक राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास श्रद्धानगरी व जोशीनगर गणेशोत्सव मंडळाचे मकरंद जोशी, किरण वर्पे, महेंद्र निकम, अक्षय खजुरे, विजय भोकरे, संतोष कुलकर्णी, विकी नरोडे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गणेशोत्सवाच्या उत्सवी वातावरणात शासकीय योजनांची माहिती, सामाजिक संदेश आणि जनहिताच्या उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमातून प्रभावी जनजागृती करण्यात आली.


वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर -9561174111

No comments