adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

उत्कृष्ट पोलीस पाटील पुरस्काराने संजय चौधरी सन्मानित न्हावीत मान्यवरांच्या हस्ते सत्कार

उत्कृष्ट पोलीस पाटील पुरस्काराने संजय चौधरी सन्मानित न्हावीत मान्यवरांच्या हस्ते सत्कार    दाखले वितरण प्रसंगी उपनगराध्यक्ष विनोद( पप्पू) चौ...

उत्कृष्ट पोलीस पाटील पुरस्काराने संजय चौधरी सन्मानित न्हावीत मान्यवरांच्या हस्ते सत्कार   


दाखले वितरण प्रसंगी उपनगराध्यक्ष विनोद( पप्पू) चौधरी,नगरसेवक पवन सराफ व सहकारी नगरसेवक

 इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


न्हावी येथील पोलीस पाटील संजय सुरेश चौधरी यांनी पोलीस पाटील म्हणून बजावलेल्या उत्कृष्ट, कर्तव्यनिष्ठ आणि उल्लेखनीय सेवाकार्याची दखल घेत त्यांना ‘उत्कृष्ट पोलीस पाटील’ पुरस्काराने गौरविण्यात आले. नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते त्यांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

संजय चौधरी यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल न्हावी येथे त्यांचा विशेष सत्कार आयोजित करण्यात आला. माजी प्रा. एन. टी. तळेले व डॉ. विलास तळेले यांच्या हस्ते संजय चौधरी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांच्यावर विविध क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पोलीस पाटील हे गावातील प्रशासन आणि नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून कार्यरत असतात. गावातील कायदा व सुव्यवस्था, सामाजिक सलोखा, प्रशासनाला सहकार्य तसेच विविध शासकीय उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी यामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची असते. संजय चौधरी यांनी आपल्या कार्यकाळात जबाबदारीची जाणीव ठेवून कर्तव्य बजावत नागरिकांशी सातत्याने समन्वय साधला. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना उत्कृष्ट पोलीस पाटील पुरस्कार मिळाल्याने न्हावी गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

सत्कारप्रसंगी प्रा. एन. टी. तळेले यांनी संजय चौधरी यांच्या कार्याचे कौतुक केले. पोलीस पाटील म्हणून त्यांनी केलेली सेवा, कर्तव्याप्रती असलेली निष्ठा आणि सामाजिक बांधिलकी यामुळे त्यांनी गावात आपली वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे त्यांनी सांगितले. मिळालेला पुरस्कार हा त्यांच्या कार्याची पावती असून, त्यांच्या पुढील सेवाकार्यासाठी तो निश्चितच प्रेरणादायी ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी प्रा. देवेंद्र पाचपांडे, सुरेश भोगे, माजी उपमुख्याध्यापक दिनकर चोपडे, पी. के. चौधरी, प्रा. एल. डी. चौधरी, शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अनिल लढे तसेच ललित कुमार फिरके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना पोलीस पाटील संजय सुरेश चौधरी यांनी आपल्या मनोगतात मित्र, सहकारी आणि हितचिंतकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मिळालेला सन्मान हा केवळ वैयक्तिक गौरव नसून, पुढील काळात अधिक जबाबदारीने आणि अधिक उत्कृष्ट पद्धतीने समाजाची व प्रशासनाची सेवा करण्याची प्रेरणा देणारा आहे, असे त्यांनी सांगितले. आपल्या कार्याची दखल घेऊन मित्रांनी केलेला हा सन्मान आपण कायम स्मरणात ठेवू, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या शेवटी ललित कुमार फिरके यांनी उपस्थितांचे आभार मानले. संजय चौधरी यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

No comments