adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

प्रभाग क्रमांक २ मध्ये विकासकामांचा शुभारंभ

प्रभाग क्रमांक २ मध्ये विकासकामांचा शुभारंभ  भरत कोळी यावल तालुका प्रतिनिधी (संपादक : हेमकांत गायकवाड) शहरातील प्रभाग क्रमांक २ मधील मदिना न...

प्रभाग क्रमांक २ मध्ये विकासकामांचा शुभारंभ 




भरत कोळी यावल तालुका प्रतिनिधी

(संपादक : हेमकांत गायकवाड)


शहरातील प्रभाग क्रमांक २ मधील मदिना नगर व कृष्णातारा नगर परिसरातील विविध विकासकामांचा शुभारंभ आज लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. छायाताई अतुल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिक नागरिकांच्या हस्ते संपन्न झाला अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या विविध नागरी सुविधांच्या कामांना सुरुवात होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत होते सदरील कामाचे भूमिपूजन माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल भाऊ पाटील, गटनेते सागर चौधरी, नगरसेवक पराग सराफ, नगरसेवक निसार शेख, रुबाब तडवी यांच्यासह परिसरातील नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मदिना नगर व कृष्णातारा नगर परिसरात गेल्या काही वर्षांपासून विविध नागरी समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत होते. परिसरातील मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा व्हावी, नागरिकांच्या दैनंदिन अडचणी दूर व्हाव्यात आणि परिसराचा नियोजनबद्ध विकास व्हावा, यासाठी स्थानिक नागरिकांकडून सातत्याने विकासकामांची मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांना प्रत्यक्ष सुरुवात होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान नागरिकांनी लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. छायाताई अतुल पाटील तसेच उपस्थित नगरसेवकांचे स्वागत करून विकासकामांसाठी आभार मानले. 

यावेळी हकीम शेठ, कदीर खान, मजहर भाई, करीम मन्यार, उमर कच्ची, निलेश बारी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख शरद बापू कोळी, शिवसेना शहर प्रमुख जगदीश कवडी वाले, माजी तालुकाप्रमुख कडू नाना पाटील, योगेश पाटील, शिवसेनेचे ज्येष्ठ विभाग प्रमुख पप्पू जोशी, सारंग बेहेडे, नईम खान, यावल शहर काँग्रेसचे पदाधिकारी हाजी शेख फारुख शेख युसूफ ज्येष्ठ पत्रकार अरुण दादा पाटील, नरेंद्र शिंदे, जुगल घारू, भूषण खैरे, राज शिर्के, गोलू माळी यांच्यासह मदिना नगर, कृष्णातारा नगर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागरिकांच्या मागण्यांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न

प्रभागातील नागरिकांना आवश्यक असलेल्या नागरी सुविधा उपलब्ध करून देणे आणि प्रलंबित विकासकामांना गती देणे यावर भर दिला जात असल्याचे यावेळी उपस्थित पदाधिकारी व नगरसेवकांनी सांगितले. विकासकामांमुळे परिसरातील नागरिकांच्या अनेक वर्षांपासूनच्या समस्या मार्गी लागण्यास मदत होणार असून, आगामी काळातही प्रभागातील आवश्यक कामांना प्राधान्य देण्यात यावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

No comments