adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भालोद येथे आदिवासी वस्तीतील नागरिक मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित निरीक्षकांनी भालोद येथील आदिवासी वस्तीची तात्काळ प्रत्यक्ष पाहणी करावी आंदोलन करांची मागणी

भालोद येथे आदिवासी वस्तीतील नागरिक मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित निरीक्षकांनी भालोद येथील आदिवासी वस्तीची तात्काळ प्रत्यक्ष पाहणी करावी आंद...

भालोद येथे आदिवासी वस्तीतील नागरिक मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित

निरीक्षकांनी भालोद येथील आदिवासी वस्तीची तात्काळ प्रत्यक्ष पाहणी करावी आंदोलन करांची मागणी  






इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


भालोद येथील आदिवासी वस्तीची पाहणी व नागरी सुविधा जळगाव जिल्हा व तालुक्यातील गाव भालोद येथील आदिवासी वस्तीतील नागरिक मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित आहेत. यावल प्रकल्प कार्यालयाने आपल्या निरीक्षकांमार्फत भालोद येथील आदिवासी वस्तीची तात्काळ प्रत्यक्ष पाहणी (Inspection) करून तेथील रखडलेल्या रस्ते, पाणी, वीज व इतर मूलभूत सुविधा त्वरित पुरवाव्यात.

इतर महत्त्वपूर्ण मागण्या:

क्रांतीकारकांचे पुतळे: ५% पेसा निधीतून सर्व शाळा व ग्रामपंचायतींमध्ये आदिवासी क्रांतीकारकांचे पुतळे उभे करावेत.

शैक्षणिक व वसतिगृह सुधारणा: ५ ऑगस्ट २०२६ चा अन्यायकारक जी.आर. तात्काळ रद्द करावा. आश्रमशाळांमधील निकृष्ट 'सेंट्रल किचन' पद्धत बंद करून पूर्वीप्रमाणे ताजा आहार द्यावा. कॉलेजमधील अवाजवी वसुली थांबवून वसतिगृह विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्ता वाढ व स्वतंत्र बस सेवा सुरू करावी.

आरोग्य यंत्रणा: प्रत्येक PHC मध्ये २४ तास निवासी डॉक्टर, रुग्णवाहिका आणि सर्पदंश व तातडीच्या उपचारांचा पूर्ण औषधसाठा उपलब्ध करावा.

वनहक्क (FRA) व स्थानिक प्रश्न: विस्थापन करणारी 'यावल वाईल्डाईफ सँक्चुरी' मंजुरी रद्द करावी, सर्व प्रलंबित वनहक्क पट्टे (दावे) मंजूर करावेत आणि सत्रासेन (किसनपाडा) येथे पिण्याच्या पाण्यासाठी विहीर खोदकामाला तात्काळ परवानगी द्यावी.

बदनामी करणाऱ्यांवर FIR: २९ ऑगस्ट २०२६ रोजी संघटनेच्या उप प्रदेशाध्यक्षांच्या नावाने खोटी तक्रार करून दिशाभूल व बदनामी करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा. विविध संघटनांचा एकमुखी पाठिंबा: या आंदोलनाला परिसरातील बहुसंख्य सामाजिक व राजकीय संघटनांनी जाहीर पाठिंबा दर्शवला आहे:

 आसम परिवार

भीम आर्मी

स्टार संघटना

 तडवी भिल्ल विवाह युवा कृती समिती

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आदिवासी सेल काँग्रेस समिती

 बिरसा महामानव संघटना

आंदोलनात सहभागी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते:

यावेळी निवेदक व प्रमुख उपस्थितीत जिल्हाध्यक्ष मुराद तडवी, रोनक तडवी, राजू दादा तडवी, रमोद पाडवी, सचिन पावरा, प्रवीण पावरा, जयदास पावरा, समाधान पावरा, सलीम छबु कुसुंबा, नसीर इब्राहिम लोहारा, सरफराज एकबार, फिरोज अब्बास सांगवी, सरदार बलदार हंबर्डे, सलीम सुभान पाल, राजू अकबर करजोत, नबाब दादा पिपरी, जहांगीर अहिरवाडी, जाबीर कबीर चिचाटे, फकीरा दादा नायगाव, नूर मोहम्मद इब्राहिम मोहगन, भिकारी दादा युवरा, नासिर दादा भाटकेळा, बबीता तडवी भटकेळा, जुबेदा बाई आमदा, आजराबाई आमदा तसेच भालोद महिला मंडळ गटाच्या महिला व शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments