adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अंतुर्ली येथे गणपती विसर्जनापूर्वी पोलिसांचा रुट मार्च

अंतुर्ली येथे गणपती विसर्जनापूर्वी पोलिसांचा रुट मार्च अंतुर्ली प्रतिनिधी किरण धायले (संपादक : हेमकांत गायकवाड) आगामी श्री गणपती विसर्जनाच्य...

अंतुर्ली येथे गणपती विसर्जनापूर्वी पोलिसांचा रुट मार्च





अंतुर्ली प्रतिनिधी किरण धायले

(संपादक : हेमकांत गायकवाड)


आगामी श्री गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे शांतता सुव्यवस्था व सुरक्षिततेचे वातावरण कायम रहावे तसेच नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण व्हावे या उद्देशाने २३ सप्टेंबर रोजी संध्याकाळी अंतुर्ली येथे पोलीस प्रशासनाच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला. पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या रूट मार्चमध्ये डीवायएसपी नंदराज पाटील, पी आय आशिष अडसूळ, पीएसआय तुषार पाटील यांच्यासह आरसीपीचे एक पथक ,२० मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी ,१५ होमगार्ड ,१० नवप्रविष्ट पोलीस शिपाई यांची उपस्थिती होती. अंतुर्ली येथील वेगवेगळ्या भागातून रुट मार्च काढण्यात आला नागरिकांनी गणपती विसर्जन शांततेत करावे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे .अंतुर्ली येथे मुक्ताईनगर पोलिसांकडून रुट मार्च काढण्यात आला कायदा व सुव्यवस्थेसाठी प्रशासन सज्ज झालेले आहेत विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर पोलीस ॲक्शन मोड मध्ये आलेले आहे शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी बंदोबस्त आहे शांततेत गणपती विसर्जन पार पाडण्याचे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे.अशा प्रकारे मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे पोलीस प्रशासनाच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला.

No comments