adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

लासूर गावात गणरायाचे शांततेत विसर्जन चोपडा ग्रामीण पोलीसांचा स्तुत्य कामगिरी

लासूर गावात गणरायाचे शांततेत विसर्जन चोपडा ग्रामीण पोलीसांचा स्तुत्य कामगिरी गणेश मंडळाचे स्वागत करतांना सरपंच नर्मदाबाई भील, उपसरपंच अनिल प...

लासूर गावात गणरायाचे शांततेत विसर्जन चोपडा ग्रामीण पोलीसांचा स्तुत्य कामगिरी



गणेश मंडळाचे स्वागत करतांना सरपंच नर्मदाबाई भील, उपसरपंच अनिल पाटील, पो पा.जितेंद्र पाटील, इ.

विश्राम तेले (चौगाव प्रतिनिधी)

(संपादक : हेमकांत गायकवाड)


येथून जवळच असलेल्या लासूर ता.चोपडा या गावात दरवर्षी सात दिवसांत गणरायाची विसर्जन मिरवणूक सुखरूप पार पडली. चोपडा शहर पाठोपाठ लासूर गावात देखील पारंपरिक वाद्य ढोल ताशे, गुलाल उधळत श्रींना अखेरचा निरोप देण्यात आला. गुलाल किंग म्हणून आता लासूर गावाची ओळख वेगळी व्हायला लागली. नेहमी प्रमाणे लासूर ग्राम पंचायत ने बाजार चौकात येणाऱ्या प्रत्येक गणेश मंडळाचा सत्कार करण्यात येत होता. यामध्ये गावाच्या महिला लोकनियुक्त सरपंच नर्मदा ताई भिल्ल, उपसरपंच अनिल बापू पाटील, गावाचे पोलीस पाटील जितेंद्र पाटील,ग्राम महसूल अधिकारी भुषण पाटील, ग्रामपंचायत चे सर्व सदस्य व विविध संस्था चे पदाधिकारी यांनी देखील बाजार चौकात उपस्थित राहून गणेश भक्तांचे कौतुक केले. तालुक्याचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी गावातील सर्व गणेश मंडळांना ट्रॉफी पाठवून प्रा . ए.के.गंभीर, जितु महाजन, राहुल पाटील, गोकुळ महाजन अशोक संदनशिव व शिवसैनिकांनी त्या ट्रॉफी चे वाटप केले. चेतन सुराणा च्या दुकाना जवळ बॅरिगेट्स लावून पोलीसांचा चोख बंदोबस्त त्या ठिकाणी लावण्यात आला. म्हणजे गोंधळ होणार नाही याची दक्षता घेतली. 

खरे कौतुक करावे ते चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली लासूर बिट हवालदार गणेश पाटील व त्यांचे सहकारी चेतन माळी, विशाल पाटील, किशोर महाजन व संपुर्ण ग्रामीण पोलीसांचे लासूर गावात सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक निमित्ताने कायद्याचे नियमांचे पालन कसे करावे हे त्यांनी दाखवून दिले. गणेश भक्तांमध्ये थोडीशी नाराजी झाली परंतु गावकऱ्यांनी तोंडभरून पोलीस प्रशासनाचे कौतुक केले. कारण नियमांचे पालन व्हायलाच पाहिजे गावातील सर्व भक्तांनी गणरायाला निरोप दिला . फोटो. गणेश मंडळाचे स्वागत करतांना सरपंच नर्मदाबाई भील, उपसरपंच अनिल पाटील, पो पा.जितेंद्र पाटील, इ.

No comments