म्हसावद येथील द्वारकाबाई थेपडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गोकुळाष्टमी मोठ्या उत्साहात साजरी जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील (संपादक -...
म्हसावद येथील द्वारकाबाई थेपडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गोकुळाष्टमी मोठ्या उत्साहात साजरी
जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे द्वारकाबाई थेपडे इंग्लिश मीडियम स्कूल, म्हसावद येथे गोकुळाष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण व राधेच्या वेशभूषेत सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित गीते व नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच गोविंदा पथकाने दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला. ‘गोविंदा आला रे!’ च्या जयघोषात करत करत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग मोठ्या संख्येने घेतला.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना श्रीकृष्णाच्या शिकवणीतून प्रेम, मैत्री, धैर्य आणि कर्तव्य यांचे महत्त्व समजावून सांगितले. संपूर्ण कार्यक्रम आनंदी, उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.


No comments