adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अंकलेश्वर - बुऱ्हानपूर महामार्गाचे केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या हस्ते भूमिपूजन

  अंकलेश्वर - बुऱ्हानपूर महामार्गाचे   केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या हस्ते  भूमिपूजन   मुबारक तडवी रावेर  (संपादक -:- हेमकांत ग...

 अंकलेश्वर - बुऱ्हानपूर महामार्गाचे  केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या हस्ते  भूमिपूजन 


 मुबारक तडवी रावेर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अंकलेश्वर बुऱ्हानपूर मार्गावरील फैजपूर–सावदा मार्गाच्या काँक्रीटीकरणासाठी  27.99 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून 14.230 कि.मी. लांबीच्या समांतर मुख्य रस्त्याचे भूमिपूजन; वाहतूक अधिक सुरक्षित व गतिमान होणार आहे 

 बऱ्हाणपूर –अंकलेश्वर चारपदरी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांतर्गत फैजपूर शहर ते सावदा शहरादरम्यानच्या समांतर मुख्य रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाचे आज केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचे हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यानंतर कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. या रस्त्यासाठी 27.99 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, एकूण 14.230 कि.मी. लांबीच्या मार्गाचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे.

फैजपूर शहर ते सावदा शहर या मार्गावरील कि.मी. 189.240 ते 204.500 या टप्प्यात हे काम होणार आहे. बुऱ्हानपूर–अंकलेश्वर चारपदरी राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगाने सुरू असताना या महामार्गामुळे रावेर, यावल, फैजपूर आणि सावदा शहरांना बायपास मार्ग उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शहरांतर्गत विद्यमान रस्त्यांच्या विकासाबाबत निर्माण होणाऱ्या संभाव्य अडचणी लक्षात घेऊन नागरिकांची दैनंदिन वाहतूक, व्यावसायिक व्यवहार आणि दळणवळण सुरळीत राहावे, यासाठी केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प सुरू आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या माध्यमातून फैजपूर–सावदा मार्गाच्या काँक्रीटीकरणासाठी पाठपुरावा करण्यात आला.

या रस्त्याच्या काँक्रीटीकरणामुळे मार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित, सुलभ आणि गतिमान होण्यास मदत होणार आहे. तसेच नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, परिसरातील दळणवळण व्यवस्था सुधारण्यासोबतच स्थानिक विकास आणि अर्थव्यवस्थेलाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

भूमिपूजन कार्यक्रमास विधानपरिषद सदस्य नंदकिशोर महाजन, लोक नगराध्यक्षा रेणुका पाटील, भाजपा गटनेत्या रंजना भारंबे, बेटी बचावच्या सारिका चव्हाण, मंडळ अध्यक्ष दुर्गादास पाटील यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कामाची प्रमुख माहिती

मार्ग : फैजपूर शहर ते सावदा शहर

लांबी : 14.230 कि.मी.

टप्पा : कि.मी. 189.240 ते 204.500

काम : समांतर मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरण

मंजूर निधी : ₹27.99 कोटी

No comments