जागतिक दिव्यांग दिनी दिव्यांग निधी" मिळावा, फैजपूर दिव्यांग सेनेची मुख़्याधिकारी यांचेकडे मागणी. फैजपूर मुख्याधिकारी अविनाश गांगुर्डे य...
जागतिक दिव्यांग दिनी दिव्यांग निधी" मिळावा, फैजपूर दिव्यांग सेनेची मुख़्याधिकारी यांचेकडे मागणी.
फैजपूर मुख्याधिकारी अविनाश गांगुर्डे यांना निवेदन देताना दिव्यांग बांधव
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक : हेमकांत गायकवाड)
फैजपूर दिव्यांग सेनेच्या वतीने शासनाच्या निर्देशानुसार व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रत्येक नगरपालिका, महानगरपालिका यांनी आपल्या उत्पन्नातील पाच टक्के निधी दिव्यांग व्यक्तिच्या कल्याण व समक्षीकरणासाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. परंतु सदर निधी हा वर्ष अखेर दिला जात असलेने त्याचा योग्य लाभ दिव्यांगाना मिळत नाही.तसेच सन 20 १८ पासुन फैजपूर नपा कडे दिव्याग बांधवाना कार्यलयासाठी गाळा मिळणेबाबत मागणी आहे परंतु त्यावर आजपर्यंत कोणताही सकारात्मक निर्णय घेणेत आला नाही.गाळा देणेबाबत मुख्याधिकारी यांनी नकारात्मक भुमिका घेतली.मागणी केलेली कर्यालयाची जागा दिव्यांग बाधवाना न मिळाल्यास संपूर्ण शहरातील दिव्यांग बांधव नपा समोर लोकशाही मार्गाने उपोषणाचा मार्ग स्विकारतील असा इशारा देण्यात आहोत.
या आशयाचे निवेदन सघटनेचे वतीने मुख्याधिकारी सो, प्रांतधिकारी सो व नगराध्यक्ष यांना देणेत आले.यावेळी अध्यक्ष नितीन महाजन, उपाध्यक्ष जितेंद्र मेढे, मो. वसिम, तालुकाध्यक्ष योगेश चौधरी,ता.सचिव चेतन तळेले, दिव्यांग प्रकल्प अधिकारी प्रविण सपकाळे,सदस्य रोहीत तायडे, सुषमा महाजन, गणेश भारंबे, संजय वानखेडे,नाना मोची, युनूस तडवी, शे.रईस, राहुल बोरोले, शे. रियाज, शोएब, अयसान कुरेशी, विजय गलवाडे व दिव्यांग बांधव उपस्थित होते.

No comments