adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आरक्षण उपवर्गीकरण विरोधी लोक संघर्ष समितीची चोपडा शहरात महत्त्वाची बैठक सप्पन्न

आरक्षण उपवर्गीकरण विरोधी लोक संघर्ष समितीची चोपडा शहरात महत्त्वाची बैठक सप्पन्न चोपडा ता चोपडा येथे आरक्षण उपवर्गीकरण विरोधी लोक संघर्ष समित...

आरक्षण उपवर्गीकरण विरोधी लोक संघर्ष समितीची चोपडा शहरात महत्त्वाची बैठक सप्पन्न






चोपडा ता चोपडा येथे आरक्षण उपवर्गीकरण विरोधी लोक संघर्ष समितीची बैठक प्रसंगी राजू सुर्यवंशी भानुदास विसावे रोहन सुर्यवंशी मुंकुदराव सपकाळे सतीष गायकवाड समाधान सपकाळे अशोक बाविस्कर गोपाल सोनवणे संतोष अहिरे विनोद खजुरे आदी मान्यवर


चोपड़ा प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


चोपडा येथे आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात, अनुसूचित जातीची एकता टिकवण्यासाठी, सामाजिक न्यायाच्या व भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी तसेच अनुसूचित जातीतील सर्व 59 जातींचे हित जपण्यासाठी जळगाव येथे 'जन आक्रोश महामोर्चा' चे आयोजन करण्यात आले आहे. या महामोर्चाच्या पूर्वतयारीसाठी मंगळवार, दिनांक 29 सप्टेंबर रोजी स्टेट बॅक समोर गौतम नगर जवळ डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन चोपडा येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीस मा. नगरसेवक व RPI चे जिल्हाध्यक्ष . राजू सूर्यवंशी, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष . भानुदास विसावे, नगरसेवक . रोहन सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते व अभ्यासक . मुकुंदराव सपकाळे, सतीश गायकवाड, समाधान सपकाळे, अशोक बाविस्कर, गोपालराव सोनवणे, संतोष अहिरे, अरुण मोरे (नाना), सोपान मोरे, विनोद खजूरे, जितेंद्र विसावे, व 59 जातींमधील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी-माजी लोकप्रतिनिधी, विविध संघटनांचे कार्यकर्ते आणि संविधानवादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच 

जळगाव येथे रविवार 4 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 2:00 वाजता शिवतीर्थ मैदान, कोर्ट चौक येथे हा ऐतिहासिक जन आक्रोश महामोर्चा निघणार आहे. या महामोर्चात 59 जातींचे हजारो नागरिक सहभागी होणार असून, अनुसूचित जातीच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व 59 जाती-समूहांनी व संविधानप्रेमी नागरिकांनी आपल्या हक्क आणि अधिकारांच्या रक्षणासाठी एकत्र यावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. 


No comments