जे.ई.स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये संस्कृत दिन उत्साहात साजरा मुक्ताईनगर प्रतिनिधी : सतीश गायकवाड (संपादक : हेमकांत गायकवाड) मुक्ताईनगर : जे...
जे.ई.स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये संस्कृत दिन उत्साहात साजरा
मुक्ताईनगर प्रतिनिधी : सतीश गायकवाड
(संपादक : हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर : जे. ई. स्कूल व ज्युनिअर कॉलेज, मुक्ताईनगर येथे दिनांक ८ सप्टेंबर रोजी संस्कृत दिन उत्साहपूर्ण व शैक्षणिक वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक व्ही. एम. चौधरी, उपमुख्याध्यापिका व्ही. के. शिर्के, पर्यवेक्षक व्ही. डी. बऱ्हाटे, के. आर. कवळे व एस. एम. वाढे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदनाने करण्यात आली.
यावेळी कु. देवश्री विकास पाटील हिने गणपती अथर्वशीर्ष व शारदा स्तोत्र सादर केले. कु. आर्या लांडे हिने रामस्तुती भजन सादर केले. कु. शर्वरी केतन पाटील हिने सूत्रसंचालनासोबत कालभैरवाष्टक सादर केले. कु. आकांक्षा सुनील पाटील हिने महिषासुरमर्दिनी स्तोत्राचे सुंदर गायन केले.
जानवी विकास पाटील हिने आधुनिक काळात संस्कृत भाषेचे महत्त्व व तिचे संवर्धन करण्याची गरज स्पष्ट केली. अदिती अजय कुलकर्णी व वल्लभ अजय कुलकर्णी यांनी संस्कृत भाषेचे महत्त्व सांगणारी नाटिका सादर केली. यावेळी विद्यार्थ्यांनी संस्कृत श्लोक, सुविचार व संस्कृत भाषेविषयी विविध माहिती सादर करून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या शेवटी संस्कृत विषय शिक्षिका एम. आर. पाटील यांनी संस्कृत दिन साजरा करण्यामागील उद्देश व संस्कृत भाषेचे महत्त्व विशद केले. भारतीय संस्कृतीचे सखोल ज्ञान प्राप्त करण्यासाठी संस्कृत भाषा शिकणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संस्कृत दिनाचा कार्यक्रम आनंददायी, प्रेरणादायी व शैक्षणिक वातावरणात यशस्वीपणे संपन्न झाला.
No comments