गणेश फेस्टिवल मध्ये मुस्लिम बॅंकेच्या सहकार्याने ऑल इंडिया मुशायरा संपन्न गणेश फेस्टिवल मधील मुशायरा एकात्मता व संस्कृतीचे प्रतीक - ॲडिशनल ...
गणेश फेस्टिवल मध्ये मुस्लिम बॅंकेच्या सहकार्याने ऑल इंडिया मुशायरा संपन्न
गणेश फेस्टिवल मधील मुशायरा एकात्मता व संस्कृतीचे प्रतीक - ॲडिशनल कलेक्टर मोनिका सिंह
अहिल्यानगर / प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
गणेश फेस्टिवलच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला मुशायरा हा सामाजिक एकात्मता, बंधुभाव आणि सांस्कृतिक समन्वयाचे सुंदर प्रतीक आहे. भारताची ओळख ही विविधतेत एकता या संस्कृतीमुळे आहे. विविध धर्म, भाषा आणि परंपरा असतानाही आपण सर्वजण भारतीय म्हणून एकत्र आहोत, ही भावना अशा सांस्कृतिक कार्यक्रमांतून अधिक दृढ होते.
मुशायरा ही उर्दू साहित्याची समृद्ध परंपरा असून, शायरीच्या माध्यमातून प्रेम, माणुसकी, बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याचा संदेश दिला जातो. गणेश फेस्टिवलसारख्या सार्वजनिक उत्सवात मुशायऱ्याचे आयोजन होणे ही आपल्या शहराच्या सांस्कृतिक समृद्धीची आणि परस्पर सन्मानाची सकारात्मक ओळख आहे.
सण-उत्सव हे केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता समाजातील विविध घटकांना एकत्र आणणारे माध्यम बनले पाहिजेत. एकमेकांच्या संस्कृतीचा आदर करणे, विविधतेचा स्वीकार करणे आणि परस्परांमध्ये प्रेम व विश्वास वाढवणे, हीच राष्ट्रीय एकात्मतेची खरी ताकद आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात सलोखा निर्माण होऊन नव्या पिढीसमोर एकात्मतेचा आदर्श निर्माण होतो, असे मत ॲडिशनल कलेक्टर मोनिका सिंह यांनी व्यक्त केले.
गणेश फेस्टिव्हल मध्ये नगर महोत्सवात मखदुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी व इकरास् पी.ए. इनामदार इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज यांच्या वतीने भव्य ऑल इंडिया मुशायराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अहिल्यानगर च्या ॲडिशनल कलेक्टर मोनिका सिंह, इकरा सोसायटीचे चेअरमन अब्दुल रहीम खोकर, सचिव आर्किटेक विकार काझी, आंतरराष्ट्रीय सुफी गायक पवन नाईक, रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलुलकर, आर्किटेक, इंजिनिअर अँड सर्वेयर असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप तांदळे, सामाजिक खिदमतगार अनीसूर्रहेमान अन्सारी, रहेमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष युनूसभाई तांबटकर, एन.एम. फाउंडेशनचे शाहिद शहा निजाम सय्यद, अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेचे अध्यक्ष सलीम खान पठाण आदी मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांचं व शायरांचा परिचय डॉ.कमर सुरूर व इंजि. इकबाल सय्यद यांनी करून दिला. प्रास्ताविक करताना डॉ. कमर सुरुर यांनी गणेश फेस्टिवल मधील नगर महोत्सवात आयोजित केल्या जाणाऱ्या मुशायरा स्व.सुधीर मेहता यांनी कश्या पद्धतीने सुरू करून देशाच्या कानाकोपऱ्यातून शायरांना नगर येथे कसे बोलावले याबद्दल उहापोह केला.तर इकबाल सय्यद यांनी मुस्लिम बॅंक पुणे मागील तेरा वर्षांपासून नियमित गणेश फेस्टिवलच्या मुशायरयाला सहकार्या बद्दल बॅंकेचे आभार मानले व बॅंकेची सर्व माहिती दिली.
या मुशायऱ्यात देशभरातील नामवंत शायर मोनिका सिंह,पुणे येथील अब्दुल हमीद हुनर, अमरावती येथील फारूक रजा, बिहार येथील आलम निजामी, पटना येथील विनित शंकर, मालेगांव येथील इर्शाद अंजुम, शकील भारती, धुळे येथील प्रतिभा जय व इब्राहीम सागर नगर येथील बिलाल अहमदनगरी यांनी आपापल्या शायरीने समाजाच्या एकता, बंधुता, देशभक्ती,बेटी,माॅं, भ्रष्टाचार, प्रेम, माणुसकी आदी अनेक वेगवेगळ्या विषयावर शायरी सादर करून वाहह..वाहह.. क्या बात है... बहोत खूब... मुकर्र इर्शाद... अश्या दादने शायरांना रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाचे प्रायोजक मुस्लिम को-ऑप. बँक लि.पुणे, सहकार्य काशिद हाॅस्पीटल, वेलनेस सेंटर व न्यू मॉडर्न कन्स्ट्रक्शन यांनी केले.
मुशायराच्या यशस्वीतेसाठी राजुभाई शेख, शफकत सय्यद, डॉ शमा फारुकी, अमीन धारानी, मखदुम खान, हसरत पठाण, जिब्रईल शेख, नसीम शेख तसेच मखदुम व इकरा सोसायटीच्या सर्व पदाधिकार्यांनी भरपूर परिश्रम घेतले.
वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार
आबीद खान- अ. नगर
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

No comments